कोहली ठरला नंबर वन !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

मुंबईः कर्णधार विराट कोहलीने या वर्षातील चौथे आणि कारकीर्दीतील पंधरावे शतक आज (शनिवार) वानखेडेच्या मैदानावर झळकवले आणि त्याचवेळी भारताला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्यात आघाडीही मिळवून दिली.

या शतकासोबतच कोहली या वर्षात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने इंग्लंडच्याच जो रूट याला मागे टाकले आहे. 

कोहलीने एकूण 36  सामन्यांमध्ये 40 डावांत तब्बल 2, 467 धावा या वर्षात केल्या आहेत. रूटने 40 सामन्यांतील 52 डावांत 2,399 धावा केल्या आहेत. कोहलीची धावांची सरासरी तब्बल 88.10 असून रूटची 49.97 आहे. 

मुंबई कसोटीत आतापर्यंत भारताने 130 षटकांत 7 बाद 405 धावा केल्या आहेत. कोहली 213 चेंडूत 14 चौकारांसह 123 धावांवर नाबाद आहे. त्याच्या साथीला जयंत यादव (42 चेंडूत 8 धावा) आहे. 

त्या आधी मुरली विजयने 282 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 136 धावा केल्या. त्याचेही मालिकेतील हे दुसरे शतक आहे. या आधी राजकोट कसोटीत विजयने 126 धावा केल्या होत्या. 

Web Title: kohali number one