विराट कोहलीचा ट्वेंटी-20 मध्ये विश्वविक्रम

वृत्तसंस्था
Wednesday, 4 July 2018

कर्णधार विराट कोहलीने आपल्या विक्रमांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. मंगळवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात कोहलीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला.

ओल्ड ट्रॅफोर्ड : कर्णधार विराट कोहलीने आपल्या विक्रमांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. मंगळवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात कोहलीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला.

तसेच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारा विराट कोहली हा भारतातील पहिला फलंदाज आहे. विराट कोहलीने 56 सामन्यातच 2000 धावांचा टप्पा पार केला. यापूर्वी न्युझीलंडचा माजी कर्णधार ब्रॅंडन मॅकलमने 66 सामन्यांत हा कामगिरी केली होती. ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली हा चौथ्या स्थानावर आहे. तर पहिल्या तीन स्थानांवर अनुक्रमे न्युझीलंडचा मार्टिन गुप्टिल, मॅकलम आणि पाकिस्तानचा शोएब मलिक हे आहेत. गुप्टिलने 68 सामन्यांमध्ये 2000 धावा केल्या तर मलिक यासाठी 92 सामने खेळला होता.

विराट कोहलीने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक पूर्ण केली होती. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अऩेक ऐतिहासिक विजय मिळविलेले आहेत. आता त्याच्या बहारदार फलंदाजीने तो अनेक विक्रम मोडीत काढत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kohli becomes fastest batsman to reach 2000 runs in T20