विराटवर स्टम्पने वार केले असते - कॉवन

पीटीआय
शनिवार, 1 एप्रिल 2017

सिडनी - ‘विराट कोहलीच्या संतापजनक वर्तनामुळे मी त्याला स्टम्पने भोसकले असते,’ असे आकांडतांडव ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू एड कॉवन याने केले आहे. ‘फॉक्‍स स्पोर्टस्‌’शी बोलताना त्याने हे धक्कादायक विधान केले आहे. नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत विराटने मर्यादांचे उल्लंघन केले. पंचांनी त्याला समजही दिली. त्यानंतर त्याने दिलगिरीही व्यक्त केली होती, असे कॉवन म्हणतो. प्रत्यक्षात मात्र बंगळूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याच्या ‘ब्रेन फेड’ प्रकरणानंतर दोन्ही संघांमधील तणाव अधिकच वाढत गेला होता. त्यातच विराटचा खांदा रांची कसोटीत दुखावला.

सिडनी - ‘विराट कोहलीच्या संतापजनक वर्तनामुळे मी त्याला स्टम्पने भोसकले असते,’ असे आकांडतांडव ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू एड कॉवन याने केले आहे. ‘फॉक्‍स स्पोर्टस्‌’शी बोलताना त्याने हे धक्कादायक विधान केले आहे. नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत विराटने मर्यादांचे उल्लंघन केले. पंचांनी त्याला समजही दिली. त्यानंतर त्याने दिलगिरीही व्यक्त केली होती, असे कॉवन म्हणतो. प्रत्यक्षात मात्र बंगळूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याच्या ‘ब्रेन फेड’ प्रकरणानंतर दोन्ही संघांमधील तणाव अधिकच वाढत गेला होता. त्यातच विराटचा खांदा रांची कसोटीत दुखावला. यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या विराटने यापुढे ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी मैत्री राहणार नाही, असे मत व्यक्त करताच ऑस्ट्रेलियाच्या आजी-माजी खेळाडू, प्रसिद्धिमाध्यमांचा अधिकच तिळपापड झाला.

१८ कसोटींत १००१ धावा करणारा कॉवन आपण भारतीय क्रिकेटचे चाहते असल्याचे सांगतो. विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पंचांनी त्याला इशाराही दिला होता. इंग्लिश ही त्यांची मातृभाषा नसल्यामुळे भारतीय खेळाडू आपल्याविषयी हिंदीतून बोलत असल्याचेही कॉवनने सांगितले.

Web Title: Kohli had hit on the stumps