आयपीएलमध्ये कोहलीचा सर्वाधिक धावांचा विक्रम

वृत्तसंस्था
Thursday, 19 April 2018

नवी दिल्ली - यंदाच्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ अपयशी ठरत असला, तरी कर्णधार विराट कोहली नेहमीच्या भरात आहे. मुंबईविरुद्ध मंगळवारी ९२ धावांची खेळी करताना त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. त्याच्या नावावर आता १५३ सामन्यांत ४,६१९ धावा आहेत. त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सुरेश रैनाला (४,५५८) मागे टाकले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kohli highest run-score in IPL