कोहली, जडेजाचे मानांकन उंचावले

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

कोहली, जडेजाचे मानांकन उंचावले एका आठवड्यात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याचे आयसीसीच्या कसोटी मानांकनांतील स्थान उंचावले आहे. आठवड्यापूर्वी चौथ्या स्थानावर असणारा कोहली नव्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. 

कोहली, जडेजाचे मानांकन उंचावले एका आठवड्यात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याचे आयसीसीच्या कसोटी मानांकनांतील स्थान उंचावले आहे. आठवड्यापूर्वी चौथ्या स्थानावर असणारा कोहली नव्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. 

कोहलीबराबेरच रवींद्र जडेजा याचेही मानांकन उंचावले आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आला आहे. कारकिर्दीमध्ये कोहली आणि जडेजा दोघांचेही सर्वोत्तम मानांकन आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचाच अश्‍विन अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचे ४९३ गुण झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या जॅक्वस कॅलिसने इतक्‍या गुणांची कमाई केली होती. त्यानंतर अशी कामगिरी करणारा अश्‍विन एकमेव अष्टपैलू खेळाडू आहे. 

तिसऱ्याच कसोटीत पाच विकेट घेणारा महंमद शमीचेदेखील मानांकन उंचावले असून, तो २१व्या स्थानावरून १९व्या स्थानावर आला आहे. कोहलीची मजल मोठी असून तो दुसऱ्या क्रमांकावरील ज्यो रुटपेक्षा केवळ १४ गुणांनी मागे आहे. कोहलीचे ८३३ गुण झाले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेला सुरवात झाली, तेव्हा कोहली १५व्या स्थानावर होता. मालिकेत आतापर्यंत तीन कसोटीत त्याने ४०५ धावा करताना तिसऱ्या क्रमांकापर्यंत उडी मारली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ अव्वल स्थानावर कायम आहे. याच मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा इंग्लंडचा यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टॉदेखील प्रथमच पहिल्या दहांत आला असून, त्याचे नववे स्थान आहे.

 

आयसीसी क्रमवारी

फलंदाज ः स्टिव्ह स्मिथ (८९७), ज्यो रुट ( ८४७), विराट कोहली (८३३), केन विल्यम्सन (८१७), हशिम आमला (७९१). गोलंदाज ः आर. अश्‍विन ( ८९१), रंगना हेराथ (८६७), डेल स्टेन (८४४), जेम्स अँडरसन (८३४), जोश हेझलवूड (८३४). अष्टपैलू ः आर. अश्‍विन (४९३), शकिब अल हसन (४०५), बेन स्टोक्‍स (३५१), रवींद्र जडेजा (३३४), मोईन अली (३१२)

Web Title: Kohli, Jadeja rank