कोहली एकाच वेळी दोन सामने खेळणार? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

इंग्लंड दौऱ्याच्या अगोदर आयर्लंडविरुद्धच्या ट्‌वेन्टी-20 मालिकेसाठी निवड समितीने काल विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ जाहीर केला; परंतु त्या वेळी त्यांनी कोहलीचा सरे या इंग्लंडमधील क्‍लबशी असलेल्या कराराच्या तारखा लक्षात घेतल्या नसाव्यात. त्यामुळे कोहली एकाच वेळी दोन सामने कसा खेळणार ही चर्चा रंगात आली आहे. 

नवी दिल्ली, ता. 9 ः इंग्लंड दौऱ्याच्या अगोदर आयर्लंडविरुद्धच्या ट्‌वेन्टी-20 मालिकेसाठी निवड समितीने काल विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ जाहीर केला; परंतु त्या वेळी त्यांनी कोहलीचा सरे या इंग्लंडमधील क्‍लबशी असलेल्या कराराच्या तारखा लक्षात घेतल्या नसाव्यात. त्यामुळे कोहली एकाच वेळी दोन सामने कसा खेळणार ही चर्चा रंगात आली आहे. 

इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी कोहली जून महिन्यात सरे क्‍लबकडून खेळणार आहे, त्यासाठी त्याने मायदेशात होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. भारतीय संघ निवडीनंतर आता ही नवी अडचण निर्माण झाली आहे. कोहलीला आता एक तर कौंटी सामना किंवा आयर्लंड विरुद्धचा सामना यापैकी एकाचीच निवड करावी लागणार आहे. या वेळी तो काय निर्णय घेतो, या कडेही सर्वांच्या नजरा लागून आहेत. 

करार केल्यानंतर सरे क्‍लबने त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण जून महिन्यात तो आमच्या क्‍लबसाठी उपलब्ध असणार आहे, सरेचा यॉर्कशायरबरोबरचा सामना 25 ते 28 जूनदरम्यान होणार आहे; तर भारताचे आयर्लंडविरुद्धचे दोन ट्‌वेन्टी-20 सामने 27 आणि 29 जूनला होणार आहेत. सरेचा सामना पूर्ण चार दिवस चालला, तर कोहली 29 जूनच्या सामन्यातही खेळण्याची शक्‍यता कमी आहे. तारखांचा हा घोळ भारताचा संघ निवडताना निवड समितीच्या लक्षात कसा आला नाही, याचे आश्‍चर्य भारतीय क्रिकेट वर्तुळात व्यक्त केले जात आहे. 

कोहली आमच्या क्‍लबसाठी पूर्ण जून महिना उपलब्ध असेल, यादरम्यान तो तीन चॅंपियन्सशिप सामने आणि 50-50 षटकांचे कमीत कमी तीन सामने खेळणार आहे, असे सरेचे क्रिकेट संचालक आणि इंग्लंडचे माजी यष्टिरक्षक ऍलेक स्टुअर्ट यांनी सांगितले. 

Web Title: kohli needs to be in two places at one time