कोहली क्रमवारीत चौथ्या स्थानावर

पीटीआय
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत चौथ्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ अपयशानंतरही आघाडीचे स्थान टिकवून आहे. मात्र, अव्वल स्थानाच्या शर्यतीत असणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांबरोबरील त्याचा गुणांचा फरक कमी होत आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कोहलीने २४८ धावा करताना विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या खेळीमुळे त्याने ९७ गुणांची कमाई करताना ५० कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत प्रथमच पहिल्या दहांत सर्वोच्च स्थान मिळविले. क्रमवारीत ८०० गुण पार करणारा कोहली ११वा फलंदाज ठरला आहे. टी-२० क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानावर असणारा कोहली तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातही सातत्यपूर्ण कामगिरी करून अव्वल क्रमांकासाठी असणाऱ्या गुणांमधील फरक कमी करू शकतो.

इंग्लंडचा ज्यो रूट दुसऱ्या स्थानावर असून, त्याच्या आणि कोहलीच्या गुणांमध्ये २२ गुणांचा फरक आहे. याच कसोटी सामन्यात पहिल्या डावात शतकी खेळी करणारा भारताचा चेतेश्‍वर पुजारादेखील एक स्थान वर म्हणजे नवव्या स्थानावर आला आहे. गोलंदाज महंमद शमी २१व्या स्थानावर आला असून, रवींद्र जडेजाने एका क्रमाकाची झेप घेत सहावे स्थान मिळविले आहे. 

Web Title: Kohli ranked fourth