कोहली हा "वनडे'तील सर्वोत्तम फलंदाज: पॉंटिंग

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

कसोटी प्रकारात त्याच्या कामगिरीचे विश्‍लेषण करण्यासाठी आणखी काही काळ देणे आवश्‍यक आहे. तेंडुलकर, लारा, कॅलिस अशा सार्वकालिक सर्वोत्तम फलंदाजांबरोबर त्याची आत्ताच तुलना करणे योग्य नाही

मेलबर्न - भारतीय कर्णधार विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व प्रसिद्ध फलंदाज रिकी पॉंटिंग याने व्यक्त केले आहे. परंतु, कोहली याचे कसोटी प्रकारामधील स्थान ठरविण्यासाठी अजून काही काळ देणे आवश्‍यक असल्याची भावना पॉंटिंग याने व्यक्त केली.

"कोहली हा सध्या एकदिवसीय क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम फलंदाज आहे. एकदिवसीय प्रकारातील त्याची कामगिरी उत्तम आहेच. मात्र कसोटी प्रकारात त्याच्या कामगिरीचे विश्‍लेषण करण्यासाठी आणखी काही काळ देणे आवश्‍यक आहे. तेंडुलकर, लारा, कॅलिस अशा सार्वकालिक सर्वोत्तम फलंदाजांबरोबर त्याची आत्ताच तुलना करणे योग्य नाही. या खेळाडूंनी शेकडो कसोटी सामने खेळले आहेत. विराट याने अजून याच्या निम्मे सामने खेळलेले नाहीत,'' असे पॉंटिग याने सांगितले.

Web Title: Kohli world's best in one-dayers: Ponting