'विराटच्या फलंदाजीवर आक्रमकतेचा परिणाम'

पीटीआय
शनिवार, 1 एप्रिल 2017

कोलकाता - आक्रमकता स्फोटकपणे सादर केल्याचा परिणाम विराट कोहलीच्या फलंदाजीवर झाला, असे टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचे म्हणणे आहे. आता पुन्हा धावांचा पाऊस पाडण्यासाठी विराटला ‘कूल डाउन’ होणे गरजेचे असल्याचेही गांगुलीने सांगितले.

आयसीसीच्या संकेतस्थळावरील स्तंभलेखात गांगुली म्हणतो, कर्णधार म्हणून कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याच्या प्रबळ इच्छेतून कोहलीची आक्रमकता विराट रूप धारण करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर विराट विजय मिळवण्यासाठी अधिक प्रयत्नशील होता.   ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेपूर्वी विराट जबरदस्त फॉर्मात होता. चार सलग मालिकांमध्ये द्विशतक करणारा तो पहिला फलंदाजही ठरला होता; परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच डावांत मिळून त्याला अवघ्या ४६ धावाच करता आल्या.

कर्णधार व फलंदाज असे माझ्यासाठी दोन विराट आहेत. फलंदाज म्हणून तो क्रिकेटविश्‍वात सर्वोत्तम आहेच. त्याने स्वतःहून वेगळा दर्जा निर्माण करून ठेवला आहे. त्याची धावांची भूक कधीही कमी होत नाही. कर्णधार म्हणून तो अधिक भावनाप्रधान आहे. नेतृत्वाच्या पलीकडे तो दुसरा कोणताही विचार करत नाही. तो प्रत्येक दिवस जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतो; पण प्रत्येक दिवशी ते शक्‍य होत नाही. नंबर एकच्या खाली जायचे नाही हेच त्याचे उद्दिष्ट असते, असेही गांगुलीने म्हटले आहे.

Web Title: Kohli's batting aggression results