कोहली वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

भारतीय कर्णधाराचा "विस्डेन'कडून सन्मान
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची बुधवारी "विस्डेन'च्या वतीने 2016 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली.

भारतीय कर्णधाराचा "विस्डेन'कडून सन्मान
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची बुधवारी "विस्डेन'च्या वतीने 2016 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली.

कोहलीच्या गेल्या वर्षातील कामगिरीचा आढावा घेऊनच त्याची निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कॅलेंडर वर्षात एकूण सहा फलंदाजांनी एक हजाराहून धावा केल्या. मात्र, त्यापैकी कुणीही कोहलीइतकी सरासरी राखू शकलेले नाही. या वर्षी कोहली "विस्डेन'च्या मुखपृष्ठावरदेखील झळकला होता. त्यानंतर आता त्याला गतमोसमातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले. "विस्डेन'चा असा दुहेरी सन्मान यापूर्वी 2003 मध्ये रिकी पॉंटिंगला मिळाला होता.

कोहलीला या वर्षी "बीसीसीआय' आणि "आयसीसी'कडून वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर 2017 मध्ये "विस्डेन'नेच त्याचा भारताचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या भारतीय खेळाडूंना हा सन्मान मिळाला होता. त्याचबरोबर "विस्डेन' पंचकात या वेळी मिस्बा उल हक आणि युनूस खान या दोन पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा सन्मान करण्यात आला आहे. 1997 नंतर प्रथमच पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना "विस्डेन'मध्ये स्थान मिळाले आहे.

आतापर्यंत "विस्डेन' पंचकात स्थान मिळविणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंची संख्या 14 झाली असून, भारताच्या पंधरा खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

"विस्डेन'चे मानकरी विराट कोहली
वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू
2016 मधील कामगिरी
- कसोटी क्रिकेटमध्ये 1215 धावा, 75.93 सरासरी
- दहा एकदिवसीय सामन्यांत 739 धावा, 92.37 सरासरी
- टी-20 क्रिकेटमध्ये 106.83 च्या सरासरीने 641 धावा

सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू - एलिसे पेरी

"विस्डेन' पंचक - मिस्बा उल हक, युनूस खान, बेन डुकेट, टोबी रोलॅंड जोन्स, ख्रिस वोक्‍स

Web Title: Kohli's best cricketer of the year