कर्णधार कोहलीच्या खेळण्याविषयी संभ्रम

पीटीआय
शुक्रवार, 24 मार्च 2017

रांची - ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी निर्णायक कसोटी दोन दिवसांवर आली असताना कर्णधार विराट कोहलीच्या उपलब्धतेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. ‘बीसीसीआय’ने चौथ्या कसोटीसाठी त्याला पर्याय म्हणून म्हणून मुंबईच्या श्रेयस अय्यरची निवड केली आहे.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघाने आज मैदानावर सराव केला. कर्णधार विराट कोहली मैदानावर उपस्थित असला तरी, त्याने सरावात सहभाग घेतला नाही. तो केवळ चर्चेत सहभागी झाला. विराटला तंदुरुस्त करण्यासाठी संघ व्यवस्थापन अहोरात्र झटत आहे. अजून दोन दिवस त्याच्या खांद्यावर उपचार करावे लागणार आहेत. कोहलीच्या तंदुरुस्तीविषयी संघ व्यस्थापन थेट बोलण्यास तयार नसले, तरी ‘बीसीसीआय’ने त्याच्यासाठी पर्याय तयार ठेवला आहे. बीसीसीआयने गुरुवारी संध्याकाळी श्रेयस अय्यरला धरमशालेत रवाना होण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

क्षेत्ररक्षण करताना उजव्या बाजूला वळताना आपल्याला अजूनही वेदना जाणवत असल्याचे तो कृतीतून दाखवत होता. खेळाडू शंभर टक्के तंदुरुस्त नसेल, तर त्याने सामन्यात भाग घेऊ नये, असा कोहलीचा आग्रह असतो. आता स्वतःला दुखापत झाली असताना कोहली काय निर्णय घेतो, याची चर्चा जोर धरत आहे. अर्थात, सामन्याचे महत्त्व लक्षात घेता शंभर टक्के तंदुरुस्त नसतानाही कोहली खेळण्याची संधी सोडणार नाही, असेच वाटत आहे.

Web Title: Kohli's confusion about the play