कोहलीचा 'विराट ट्रेलर' प्रदर्शित (व्हिडिओ)

Tuesday, 25 September 2018

क्रिकेटच्या दुनियेतील बादशहा भारताचा कर्णधार विराट कोहली आता अभिनयाच्या क्षेत्रातही पदार्पण करण्याच्या तयारीत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. विराटने त्याच्या 'ट्रेलर'चा टीझर प्रदर्शित केला आहे.

नवी दिल्ली : क्रिकेटच्या दुनियेतील बादशहा भारताचा कर्णधार विराट कोहली आता अभिनयाच्या क्षेत्रातही पदार्पण करण्याच्या तयारीत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. विराटने त्याच्या 'ट्रेलर'चा टीझर प्रदर्शित केला आहे.

विराटचे हे नवे रुप पाहून सर्व क्रिकेटप्रेमींना प्रश्न पडला आहे की तो आता अभिनय क्षेत्रात येत आहे. आशिया करंडकातून विश्रांती घेतलेल्या विराटने नुकतेच एक फोटो प्रसिद्ध करून नव्या क्षेत्रात दहा वर्षांनी पदार्पण करत आहे. आता मला रहावत नाही, ट्रेलर द मूव्ही असे त्याने असल्याचे म्हटले होते. आज त्याने त्याबद्दलचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
 

आपल्या अनोख्या स्टाईलने कायम चर्चेत असलेल्या विराटची ओळख स्टाईन आयकॉन म्हणून ओळख आहे. विराट या ट्रेलरमध्ये खूप आक्रमक दिसत आहे. व्हिडिओमध्ये मागे आगीच्या ज्वाळा दिसत असून, विराट चालत येताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kohlis Trailer displayed on Twitter