कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण

वृत्तसंस्था
Thursday, 7 June 2018

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या मेणाच्या पुतळ्याचे येथील मादाम तुसॉं संग्रहालयातील पुतळ्याचे अनावरण कोहली हा सध्या क्रीडा क्षेत्रातील भारताचा सर्वात लोकप्रिय खेळाडू ठरत आहे. या संग्रहालयात यापूर्वी लिओनेल मेस्सी, कपिल देव, उसेन बोल्ट यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. 

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या मेणाच्या पुतळ्याचे येथील मादाम तुसॉं संग्रहालयातील पुतळ्याचे अनावरण कोहली हा सध्या क्रीडा क्षेत्रातील भारताचा सर्वात लोकप्रिय खेळाडू ठरत आहे. या संग्रहालयात यापूर्वी लिओनेल मेस्सी, कपिल देव, उसेन बोल्ट यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. 

कोहलीने पुतळा पाहून समाधान व्यक्त करतानाच पुतळा बनवणाऱ्या कलाकारांचे कौतुक केले. तो म्हणाला,""माझा पुतळा तयार करताना कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. जगप्रसिद्ध संग्रहालयातील पुतळ्यासाठी माझी निवड केल्याबद्दल मी संग्रहालयातील अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. हा एक वेगळा अनुभव मला कारकिर्दीत घेता आला. माझ्याबरोबर चाहत्यांसाठी ही आयुष्यभराची आठवण असेल.'' हा पुतळा बनवण्यासाठी कोहलीची विविध कोनातील छायाचित्रे घेण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kohli's wax statue unveiled