World Cup 2019 : धोनीचं बाद होणं जिव्हारी, चाहत्याचा मृत्यू!

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

वर्ल्ड सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीचे हे बाद होणं एका चाहत्यासाठी इतका धक्का देणारे ठरले की त्याचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली :  कालच्या सेमिफायनलच्या सामन्यात धोनी धावबाद झाला आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. भारतीय संघाचा सेमीफायनलमधील पराभव संपूर्ण क्रिकेटविश्वासाठी धक्कादायक होता. असंच धोनीचं बाद होणं एका चाहत्याच्या खूपच जिव्हारी लागलं आणि चाहत्याचा मृत्यू झाला.

विजयाचे लक्ष्य गाठताना भारताला पहिला जडेजा बाद झाल्याने धक्का बसला त्यानंतर सर्वांच्या नजरा धोनीवर होत्या. पण धोनी धावबाद झाला आणि भारताचा पराभव निश्चित झाला. धोनी बाद झाल्यानंतर मैदानात एक शांतता पसरली. धोनीचे हे बाद होणं एका चाहत्यासाठी इतका धक्का देणारे ठरले की त्याचा मृत्यू झाला. कोलकाता येथील एका सायकल दुकाना श्रीकांत मैती हा सामना पाहत होते. धोनी बाद झाल्याचा धक्का श्रीकांत यांना सहन झाला नाही आणि दुकानातच त्यांचा मृत्यू झाला. श्रीकांत दुकानात त्यांच्या मोबाईलवर सामना बाहत होते. धोनीची विकेट गेल्यानंतर त्यांना झटका बसला आणि त्यांचा श्वास रोखला गेला.

श्रीकांत यांच्या शेजारी असलेल्या मिठाईच्या दुकानाचे मालक सचिन घोष यांना मोठा आवाज आल्याने ते धावत आले. घोष दुकानात पोहोचले तेव्हा श्रीकांत जमिनीवर कोसळले होते. घोष यांनी तातडीने श्रीकांत यांना रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताच्या शंभर धावा तरी होतील का अशी शंका वाटत असताना रविंद्र जडेजा आणि एम.एस.धोनी यांनी शानदार खेळी करत भारताच्या आशा उंचवल्या होत्या. सातव्या विकेटसाठी जडेजा-धोनी यांनी शतकी भागिदारी केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolkata Fan Dies After MS Dhonis Run Out Against New Zealand