दिल्लीवरील विजयाने कोलकताची  पुन्हा आघाडी

पीटीआय
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नवी दिल्ली - युसुफ पठाण आणि मनीष पांडे यांच्या वेगवान शतकी भागीदारीच्या जोरावर कोलकता नाईटरायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा चार विकेट राखून पराभव केला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये सलग तिसऱ्या विजयासह पुन्हा गुणतक्‍त्यात सरस धावगतीच्या जोरावर आघाडी घेतली. 

दिल्लीला आज घरच्या मैदानावर कोलकता संघाचे चक्रव्यूह भेदता आले नाही. दिल्लीला प्रथम फलंदाजी करताना १६८ धावांपर्यंतच मजल मारता आली. कोलकताने हे आव्हान एक चेंडू राखून पार केले. 

दिल्लीच्या तुलनेत कोलकताची सुरवात निराशाजनक होती. गौतम गंभीर, ग्रॅंडहोम आणि रॉबीन उथप्पा हे पहिले तीन फलंदाज २१ धावांत परतल्यानंतर युसुफ पठाण आणि मनीष पांडे यांनी १२ षटकांत ९.१६ च्या धावगतीने ११० धावांची भागीदारी केली. 

तत्पूर्वी दिल्लीला सॅमसन आणि बिलिंग्स यांनी ३७ चेंडूत ५१ धावांची सलामी दिली तेव्हा मोठी धावसंख्या त्यांनी अपेक्षित धरली होती, परंतु अपयशी ठरत असलेल्या करुण नायरची संथ फलंदाजी (२७ चेंडूत २१) त्यांना डावाच्या मध्यावर ब्रेक लावणारी ठरली. त्यातच त्याने १७ चेंडूंत २६ धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरला धावचीत केले. दिल्लीला १५० धावाही कठीण वाटत असताना रिषभ पंतने १६ चेंडूत ३८ धावांचा तडाखा दिला.

संक्षिप्त धावफलक ः दिल्ली ः २० षटकांत ७ बाद १६८ (संजू सॅमसन ३९ -२५ चेंडू, ७ चौकार, श्रेयस अय्यर २६ -१७ चेंडू, ४ चौकार, रिषभ पंत ३८ -१६ चेंडू, २ चौकार, ४ षटकार, कल्टर नाईल ३-२२, सुनील नारायण १-२०) पराभूत वि. कोलकता ः १९. ५ षटकांत (मनीष पांडे नाबाद ६९ -४९ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, युसुफ पठाण ५९ -३९ चेंडू, सहा चौकार, झहीर खान २-२८, कमिंस २-३९)

Web Title: Kolkata Knight Riders won