त्यावेळी कोहलीमुळेच कुंबळेला द्यावा लागला राजीनामा

वृत्तसंस्था
Thursday, 13 December 2018

कोहलीने बीसीसीआयने सीईओ राहुल जोहरी यांना अनिल कुंबळे यांना प्रशिक्षकपदावरुन हटवा अशी मागणी करणारे सात संदेश पाठवले होते. प्रशासकीय समितीने नकार देऊनही विराटला अनिल कुंबळे प्रशिक्षक म्हणून नको होते, त्यावेळी बीसीसीआय विराटच्या मागणीसमोर झुकलं. 

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील सदस्या डायना एडुलजी यांच्या ई-मेलमुळे हा गौप्यस्फोट केला आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. अनिल कुंबळे यांच्या जागी रवी शास्त्रींची नेमणूक करताना बीसीसीआयने अनेक नियम पायदळी तुडवल्याचंही एडुलजी यांनी म्हटले आहे.

कोहलीने बीसीसीआयने सीईओ राहुल जोहरी यांना अनिल कुंबळे यांना प्रशिक्षकपदावरुन हटवा अशी मागणी करणारे सात संदेश पाठवले होते. प्रशासकीय समितीने नकार देऊनही विराटला अनिल कुंबळे प्रशिक्षक म्हणून नको होते, त्यावेळी बीसीसीआय विराटच्या मागणीसमोर झुकलं. 

यावेळी एडुलजी यांनी रवी शास्त्री यांच्या नियुक्तीच्या वेळी नियम कसे तोडले गेले हे देखील सांगितलं आहे. विराटला हव्या असलेल्या उमेदवाराने अर्ज करावा यासाठी मुदत वाढवण्यात आली. या गोष्टीसाठी मी विरोध केला होता. कुंबळे हे दिग्गज खेळाडू आहेत, मात्र त्यादरम्यान परिस्थिती अशी निर्माण करण्यात आली की अनिल कुंबळे खलनायकाच्या भूमिकेत दिसायला लागले. मात्र, एक खेळाडू म्हणून अनिल कुंबळेंबद्दल आपल्या मनात आदर असल्याचं एडुलजी म्हणाल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leaked Email Details Kohlis Role In Kumbles Sacking