लेग स्पीनर्सची आयपीएल - कपिल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 April 2018

मुंबई - आयपीएलमध्ये लेग स्पीनर इतर गोलंदाजांच्या तुलनेत यशस्वी होताना दिसत आहेत. म्हणूनच की काय, भारताचा यशस्वी ऑफ स्पीनर आर. अश्‍विनही आयपीएलमध्ये लेग स्पीन गोलंदाजी करत आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले.

प्रत्येक संघात गोलंदाजीत विविधता आहे. खेळपट्टीनुसार गोलंदाजांची निवड केली जाते; पण यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या टप्प्यात लेग स्पीनरच सर्वाधिक यशस्वी झाल्याचे स्पष्ट होत आहे, असे सांगून कपिल म्हणतात, ‘‘प्रत्येक संघात लेग स्पीनर आहेत आणि अश्‍विनही पारंपरिक ऑफ स्पीनपेक्षा लेग स्पीनवरच अधिक भर देत आहे.’’

आतापर्यंत झालेल्या सामन्यांतून मुंबईचा मयांक मार्कंडे, हैदराबादचा रशीद खान, पंजाबचा अश्‍विन आणि त्याचा सहकारी मुजीब उर रेहमान, बेंगळुरूचा  युजवेंदर चहल प्रभावी ठरत आहे. लेग स्पीनर का यशस्वी ठरत आहेत, याचे निश्‍चित कारण सांगता येणार नाही. त्यांचे चेंडू समजणे कठीण नसले, तरी सोपेही नाही. त्यामुळे प्रत्येक संघ एक तरी लेग स्पीनर खेळवण्यावर भर देत आहे, असे कपिल यांनी म्हटले आहे.

त्याच वेळी त्यांनी चेन्नई आणि राजस्थान यांच्यात काल पुण्यात झालेल्या सामन्याचे उदाहरण दिले. चेन्नईने ऑफ स्पीनर हरभजनला वगळून कर्ण शर्मा आणि इम्रान  ताहीर असे दोन लेग स्पीनर खेळवले होते. 

क्रिकेट फलंदाजांचे... तरीही
गेल्या १०० वर्षांहून क्रिकेट हा फलंदाजांचाच खेळ राहिला, परंतु गेल्या १० वर्षांच्या आयपीएलमध्ये गोलंदाजांकडून वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले आहेत. नकलबॉल आखूड टप्प्याचे हळुवार चेंडू हा त्यातलाच भाग आहे. टी-२० हा फलंदाजांचाच खेळ असला तरी तरी प्रत्येकाला कौशल्यात प्रगती करणे आवश्‍यक आहे, असे कपिल यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Legspinners IPL - Kapil