‘आमची मुंबई’साठी आग्रह धरूया

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

मुंबई - भारतीय क्रिकेटमधील मुंबईचे योगदान लक्षात घेऊन ‘एक राज्य एक मत’ या शिफारशीतून आम्हाला वगळा, अशी आग्रही मागणी करणारा ठराव मुंबई क्रिकेट संघटनेच्या विशेष वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. लोढा समितीबरोबर बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यासाठी एमसीएकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे बीसीसीआयसाठीही अपरिहार्य होत असताना मुंबई क्रिकेट संघटनेने आज विशेष वार्षिक सर्वसाधारण बोलावली होती. एमसीएशी संलग्न असलेल्या क्‍लबसमोर सत्य परिस्थिती ठेवण्यात आली आणि त्यांचेही मत आजमावण्यात आले. 

पदाधिकाऱ्यांसाठी ७० वर्षांची मर्यादा आणि तीन-तीन वर्षांची टर्म यांसह एक राज्य, एक मत या प्रमुख शिफारशी बीसीसीआयसह संलग्न संघटनांनाही अडचणीच्या ठरत आहेत. एक राज्य, एक मत ही शिफारस मुंबईसाठी अस्तित्वाच्या लढाईसारखी आहे. या मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक एक तास चालली. 

भारतीय क्रिकेट मंडळाची स्थापना आणि भारतातील क्रिकेट यामध्ये मुंबई क्रिकेटचे मोठे योगदान राहिलेले आहे. त्यासाठीच मुंबईला भारतीय क्रिकेटची पंढरीही समजली जाते. मुंबईचा एकूणच प्रभाव पाहता, या शिफारशीचा मुंबईच्या अस्तित्वावर परिणाम होईल, असे मत मांडण्यात आले. या शिफारशीचा आपल्याला कसा तोटा होऊ शकतो, याबाबत आपण बीसीसीआय पदाधिकाऱ्यांकडे सविस्तर मत मांडू. हे पदाधिकारी लोढा समितीबरोबर होणाऱ्या बैठकीतही आपली बाजू मांडतील. त्यानंतर आपण पुढील कार्यवाही करू, असेही ठरवण्यात आले. आता शिफारशींच्या अंमलबजावणीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे असल्याने बीसीसीआयच्याही हाती काही राहिले नसल्याचे काही क्‍लब सदस्यांचे म्हणणे होते.

महाराष्ट्रातून मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ या संघटना व सीसीआय क्‍लब असे चार सदस्य बीसीसीआयशी संलग्न आहेत. बीसीसीआयच्या कारभारात या चारही संस्थांना स्वतंत्र मतदानाचा अधिकार आहे; परंतु लोढा शिफारशींमध्ये ‘एक राज्य, एक मत’, अशी महत्त्वाची अट आहे. त्यानुसार, एकच संघटना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून मतदान करू शकते. लोढा शिफारशी जाहीर झाल्यानंतर हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला होता. त्यावर लोढा समिती आणि सर्वोच्च न्यायालय या शिफारशीवर ठाम आहे. सीसीआय ही संघटना नसल्याने त्यांचा अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे. मुंबई - महाराष्ट्र - विदर्भ यांनी आलटून-पालटून मतदानाचा अधिकार बजावावा, अशी सूचना लोढा यांनी केली आहे.

Web Title: lodha committee & bcci officer meeting