बीसीसीआयवर लोढा समिती नाराज

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

मुंबई/नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लोढा समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे समिती नाराज आहे. याबाबतचा सद्यःस्थितीचा अहवाल समिती मंगळवारी (ता. २७) न्यायालयात सादर करणार आहे.

 

मुंबई/नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लोढा समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे समिती नाराज आहे. याबाबतचा सद्यःस्थितीचा अहवाल समिती मंगळवारी (ता. २७) न्यायालयात सादर करणार आहे.

 

लोढा समितीची शिफारस डावलत ‘बीसीसीआय’ने आपल्या घटनेनुसारच वार्षिक सभा घेतली. या सभेत अजय शिर्के यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली; तसेच पाच सदस्यांची राष्ट्रीय समितीही निवडण्यात आली. लोढा समितीने कार्यकारिणीऐवजी नऊ सदस्यांची सर्वोच्च समिती नियुक्त करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. समितीने राष्ट्रीय निवड समिती त्रिसदस्यीय असावी, असेही सुचवले आहे.

लोढा समितीच्या शिफारशी डावलत ‘बीसीसीआय’ने वार्षिक सभेत विविध समित्यांची नियुक्ती केली. आता ‘बीसीसीआय’ने लोढा समितीच्या शिफारशींबाबत ३० सप्टेंबरला विशेष सर्वसाधारण सभा निमंत्रित केली आहे. लोढा समितीने घटनेतील बदलासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. 

मंडळाने घेतलेल्या निर्णयांबाबत आज लोढा समितीची बैठक झाली. लोढा शिफारशींच्या अंमलबजावणीत अडथळे आणले जात आहेत, असे न्यायमूर्ती लोढा यांनी बैठकीनंतर सांगितल्याचे वृत्त आहे. भारतीय मंडळास १० सप्टेंबरपर्यंत लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा अहवाल देण्याची सूचना होती; पण हा अहवालही भारतीय मंडळाने अद्याप सादर केलेला नाही.

Web Title: Lodha committee criticizes BCCI