राहुलची फास्टेस्ट ५०

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 April 2018

दिल्ली डेअरडेव्हिल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 166 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबच्या सलामीवीर राहुल आणि मयांक अग्रवाल यांना आक्रमक सुरवात केली. राहुलने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक झळकाविले.

दिल्लीला हरवून पंजाबची विजयी सलामी
मोहाली - के. एल. राहुलच्या विक्रमी वेगवान अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमध्ये विजयी सलामी देताना दिल्ली डेअरडेव्हिल्सला सहा विकेट राखून हरविले. राहुलने १४ चेंडूंमध्येच अर्धशतकी तडाखा दिला.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला ७ बाद १६६ अशी माफक धावसंख्या उभारता आली. पंजाबने हे आव्हान सात चेंडू राखून पार केले. अश्विनच्या नेतृत्वाखाली मुजीब उर रेहमान, करुण नायर यांनीही चमक दाखविली. राहुलने आवश्‍यक धावगतीवर नियंत्रण मिळविल्यानंतर नायरने संयमी अर्धशतक काढले. 

दिल्लीला कर्णधार गंभीरच्या अर्धशतकामुळे चांगली सुरवात करता आली, पण डावाच्या मध्यास त्यांची घसरण झाली. ३ बाद १११ वरून रिषभ पंतचा झेल मुजीबच्या चेंडूवर अँड्य्रू टायने घेतला. पुढील षटकात गंभीर बाद झाला. आणखी एक विकेट गेल्यानंतर दिल्लीची ६ बाद १२५ अशी घसरण झाली. अखेरीस ख्रिस मॉरीसने उपयुक्त भर घातल्यामुळे दिल्लीला १६० धावांचा टप्पा पार करता आला.

संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स - २० षटकांत ७ बाद १६६ (गंभीर ५५-४२ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, रिषभ पंत २८-१३ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, ख्रिस मॉरीस २७, अश्विन ४-०-२३-१, मुजीब उर रेहमान ४-०-२८-२) पराभूत विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब - १८.५ षटकांत ४ बाद १६७ (राहुल ५१-१६ चेंडू, ६ चौकार, ४ षटकार, करुण नायर ५०, डेव्हिड मिलर नाबाद २४, ट्रेंट बोल्ट ३.५-०-३४-१)

राहुलचा धावांचा सिक्वेन्स 
०, २, ०, ६, ४, ४, ६, ४, १, ४, ६, ६, ४, ४

राहुलचा तडाखा
ट्रेंट बोल्टकडून पहिल्या षटकात १६ धावा वसूल
अमित मिश्राकडून २४ धावा 
यापूर्वी युसूफ पठाण व सुनील नारायण यांचे प्रत्येकी १५ चेंडूंत अर्धशतक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lokesh Rahul fifty Kings eleven Punjab beat Delhi Daredevils IPL