पंचांच्या चुकीमुळे पराभव - मॉर्गन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

नागपूर - भारतीय पंचांच्या सदोष निर्णयामुळेच इंग्लंडला भारताविरुद्धच्या दुसऱ्या ट्‌वेंटी-२० सामन्यात हार पत्करावी लागली, असा आरोप इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याने केला. अखेरच्या षटकात चेंडू बॅटला लागून पॅडल्यानंतरही पंचांनी जो रूट पायचीत असल्याचा निर्णय दिला होता.

रूट अखेरच्या षटकात आठ धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि इंग्लंड पराजित झाला. या निर्णयाने सामना भारताच्या बाजूने झुकला. हा निर्णय निर्णायकच ठरला. या खेळपट्टीवर जम बसल्यावरच धावा करता येत होत्या. जम बसलेला रूट बाद झाल्यामुळे धावा अवघड झाल्या, असे मॉर्गनने सांगितले. त्याने या संदर्भात सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

सामनाधिकाऱ्यांना अहवाल देण्याची संधी आहे. प्रत्येक सामन्यानंतर त्यांना फीडबॅक दिला जात असतो, असे मॉर्गनने सांगितले. रूट पायचीत असल्याचा निर्णय चेत्तीथॉडी शमसुद्दीन यांनी दिला होता. विश्वकरंडकासारख्या स्पर्धेत या प्रकारचा निर्णय दिला असता, तर मी जास्त चिडलो असतो, असेही मॉर्गनने सांगितले. रूटला पायचीत देणाऱ्या शमसुद्दीन यांनी कोहलीविरुद्धचे पायचीतचे अपील नाकारले होते. त्या वेळी टीव्ही रिप्लेत चेंडू यष्टींवर लागला असता हेच दिसले होते. नाबाद ठरवल्यानंतर कोहलीने १४ धावा केल्या होत्या. 

कोहलीबाबतचा निर्णयही चुकीचाच होता. त्या निर्णयाने फारसा फरक पडला नाही; पण अखेरच्या षटकात रूटला बाद दिल्याने सामन्याचे पारडेच फिरले, असे त्याने सांगितले. 

Web Title: Loss umpire's mistake