esakal | वयापेक्षा तंदुरुस्ती महत्त्वाची - धोनी
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई - आयपीएल विजेतेपदानंतर पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा यांच्यासह महेंद्रसिंह धोनी.

वयापेक्षा तंदुरुस्ती महत्त्वाची - धोनी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलचे मिळवलेले विजेतेपद हे वाढत्या वयाच्या खेळाडूंपेक्षा प्रत्येकाची तंदुरुस्ती महत्त्वाची असल्याचे सिद्ध करणारी आहे, असे मत महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केले. आयपीएलच्या लिलावात तीसपेक्षा अधिक वय असलेले नऊ खेळाडू निवडल्यामुळे चेन्नई संघावर टीका करण्यात आली होती.

सर्वजण नेहमीच वाढत्या वयाबाबत बोलतात, पण माझ्यासाठी वय कितीही असले तरी तंदुरुस्ती महत्त्वाची असते. रायुडू हा ३२ वर्षांचा आहे; परंतु मैदानात तो अतिशय चपळ असतो. कितीही धावायला लागले तरी त्याची तक्रार तो करत नाही. त्यामुळे माझ्यासाठी तंदुरुस्तीला प्राधान्य असते, असे धोनीने विजेतेपदानंतर सांगितले. 

प्रत्येक खेळाडू कोणत्या वर्षात जन्माला आला याला माझ्या लेखी काहीच अर्थ नाही. तुम्ही १९ वर्षांचे असा अथवा तिशीतले, चपळता असणे आवश्‍यक असते. त्याचवेळी दुसरी बाजूही लक्षात घेणे महत्त्वाचे असते, असे सांगून धोनीने वॉटसनचे उदाहण दिले. जर मी त्याला धाव घेण्यासाठी कॉल दिला आणि लगेचच थांबवले तर त्याला हॅमस्ट्रिंगची (मांडीचा स्नायू) दुखापत होऊ शकते. त्यामुळे तो पुढच्या सामन्यासाठी अनुपलब्ध होईल. अशा वेळी मी त्याला मध्येच थांबवणार नाही, तर कोणत्याही परिस्थितीत धाव पूर्ण करण्याची सूचना करेन.

अविस्मरणीय मोसम
गतवर्षी बंगळुरूकडून चांगली कामगिरी करता आली नव्हती. अशा परिस्थितीत यंदा दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह ५५५ धावा केल्या, त्यामुळे हा मोसम माझ्यासाठी अविस्मरणीय होता; असे मत वॉटसनने मांडले. अंतिम सामन्यात पहिल्या १० चेंडूंत मला एकही धाव करता आली नव्हती, त्यामुळे पुढील डावात किमान चेंडूमागे एक धाव करण्याचा माझा मानस होता, असेही त्याने सांगितले.

विल्यम्सननेही केले वॉटसनचे कौतुक
१७८ ही धावसंख्या पुरेशी होती. खेळपट्टीवर चेंडू थोडासा थांबूनही येत होता. पहिल्या पाच-सहा षटकांमध्ये आम्ही पकडही मिळवली होती, पण वॉटसनने आमच्या हातून सामना हिरावला, असे केन विल्यम्सन म्हणाला.

loading image
go to top