शेवटच्या सामन्यातील धोनीची चतुराई पाहून तुम्ही व्हाल थक्क!(व्हिडिओ)

Sunday, 3 February 2019

यष्टीमागे जगात सर्वांत चतुर यष्टीरक्षक म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात हिच चतुराई दाखविली. धोनीची चतुराई पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल!

वेलिंग्टन : यष्टीमागे जगात सर्वांत चतुर यष्टीरक्षक म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात हिच चतुराई दाखविली. धोनीची चतुराई पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल!

न्यूझीलंडचा जिमी निशम भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना केदार जाधवच्या गोलंदाजीवर त्याच्याविरुद्ध पायचीतचे अपील करण्यात आले. त्याचवेळी निशम क्रीजमधून थोडा पुढे गेल्याचे पाहताच धोनीने चतुराईने त्रिफळा उडविला. निशमची बॅट क्रीजमध्ये पोहचण्यापूर्वीच धोनीने त्याला धावबाद केल्याचे तिसऱ्या पंचांकडून स्पष्ट झाले. धोनीने याच मालिकेत रॉस टेलरला यष्टीचीत बाद केले होते. आजही त्याने केलेला धावबाद हे धोनीसारखा यष्टीरक्षक नाही हे स्पष्ट करणारे होते.

भारताने या मालिकेत विजयी आघाडी घेतलेली आहे. सलग तीन सामन्यांत विजय मिळविल्यानंतर चौथ्या सामन्यात भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीची अनुपस्थिती जाणविली होती. आज धोनी फलंदाजीत फक्त 1 धावा करू शकला तरी त्याचा अनुभव संघाला कामाला येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahendra Singh Dhoni run out jimmy neesham in 5th ODI