पुणेकर धोनी; 'भाऊ घेऊन टाक'!

Sunday, 3 February 2019

महेंद्रसिंग धोनी एक असामान्य अवलिया आहे. ग्रेट मॅच फिनिशर, कॅप्टन कूल, दोन विश्वकरंडक विजेता असे किती तरी अनेक मानाने तुरे त्याने आपल्या मुकूटात रोवलेले आहेत. कर्णधारपद कधीच सोडले आहे पण विराट कोहली आथवा त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा कर्णधारपद भुषवत असला तरी पडद्या (यष्टींच्या) मागून खरा सुत्रधार धोनीच असतो. गोलंदाजांना मार्गदर्शन करणे त्यानुसार क्षेत्ररक्षणात अदलाबदल करणे हे धोनी धोनीच करत असतो. पण त्याचे अस्तित्व येथेच पूर्ण होत नाही...

वेलिंग्टन- महेंद्रसिंग धोनी एक असामान्य अवलिया आहे. ग्रेट मॅच फिनिशर, कॅप्टन कूल, दोन विश्वकरंडक विजेता असे किती तरी अनेक मानाने तुरे त्याने आपल्या मुकूटात रोवलेले आहेत. कर्णधारपद कधीच सोडले आहे पण विराट कोहली आथवा त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा कर्णधारपद भुषवत असला तरी पडद्या (यष्टींच्या) मागून खरा सुत्रधार धोनीच असतो. गोलंदाजांना मार्गदर्शन करणे त्यानुसार क्षेत्ररक्षणात अदलाबदल करणे हे धोनी धोनीच करत असतो. पण त्याचे अस्तित्व येथेच पूर्ण होत नाही...

जसा देश तसा वेश पण धोनी त्याच्याही पलिकडचा आहे. समोर मराठी खेळाडू तर त्याला मराठीतू मार्गदर्शन ही कलाही धोनीने अवगत केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात मराठमोळा केदार जाधव 38 व्या षटकांत गोलंदाजी करत होता त्यावेळे धोनी यष्टीमागून बोलला....येथे नको भाऊऊऊ....घेऊन टाक !! यष्टींच्या मागील मायक्रोफोन अतिशय तीक्क्ष असल्यामुळे सर्वांना ऐकू आले पण धोनी केदारशी एरवी मराठीतच बोलत असावा..

पुणेकर होता धोनी
धोनी मुळचा रांचीचा...आयपीएलमध्ये चेन्नई हे त्याचे दुसरे घर पण चेन्नई संघावर बंदी असताना रायझिंग पुणे सुपरजायंटस असा पुण्याचा संघ तयार करण्यात आला आणि धोनी पुणेकर झाला होता. त्यामुळे मराठीशी त्याचे नाते जुळले असावेच. शिवाय केदार जाधव हा त्याचा लाडका खेळाडू. केदारही धोनीबरोबर चेन्नईकडून आयपीएल खेळतोत त्यामुळे धोनी कदाचीत केदारकडून मराठीचे धडे गिरवत असावा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahendra Singh Dhoni tie up with Kedar Jadhav in 5th ODI