रांचीतील खेळपट्टीची धोनीकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

रांची - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिकेत खेळपट्टीबाबत जास्त चर्चा होत आहे, त्याच वेळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बीसीसीआय पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याऐवजी रांचीतील खेळपट्टीचा आढावा घेतल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे.

धोनीने कसोटी क्रिकेटचा निरोप घेतला आहे. तो सध्या विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेला सध्या ब्रेक आहे. त्यामुळे धोनी रांचीत आहे. तिथेच 16 मार्चपासून भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसरी कसोटी सुरू होणार आहे. धोनीने गुरुवारी रांचीतील स्टेडियमवरील खेळपट्टी पाहिली, तसेच त्यासंदर्भात स्थानिक क्‍यूरेटर एसबी सिंग यांच्याबरोबर दीर्घ चर्चाही केली. एसबी सिंग यांनी यात काही नवे नसल्याचा दावा केला.

धोनी रांचीत असतो, त्या वेळी स्टेडियमवरील जिममध्ये खूप वेळ असतो. स्टेडियमवरही येतो. खेळपट्टीबाबत चर्चा करतो, हेच या वेळीही घडले. या वेळची चर्चाही अनौपचारिक होती. तो कधीही खेळपट्टी कशी हवी, यात हस्तक्षेप करीत नाही. धोनीबरोबरील चर्चेचा मला कायम फायदाच झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

झारखंड क्रिकेट संघटनेने तीन खेळपट्ट्या कसोटीच्या दृष्टीने तयार केल्या आहेत. प्रत्येकीचे स्वरूप वेगवेगळे आहे. प्रत्येक खेळपट्टी पाच दिवस टिकेल तसेच फलंदाज आणि गोलंदाजांना समान साथ देईल, असेही ते म्हणाले.

Web Title: mahendra singh dhoni watching ranchi play ground