प्रतिस्पर्ध्याचा आदर राखू; पण दडपणही देऊ - विराट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुणे - इतर कोणत्याही मालिकेप्रमाणे याही वेळी आमचा तसाच दृष्टिकोन आहे. आम्ही बांगलादेशलासुद्धा कमी लेखले नव्हते. ऑस्ट्रेलियाचाही आम्ही आदर राखू; पण दडपणाचा सतत मारा करून वर्चस्वाच्या निर्धाराने खेळू, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने सांगितले. 

स्मिथ आणि विराट यांच्या कारकिर्दीत बरेच साम्य आहे. याविषयी विराटने आधी स्वत-विषयी भाष्य केले. तो म्हणाला की, कर्णधार असल्यावर तुम्हाला कोणत्याही क्षणी गाफील राहून चालत नाही. माझ्यादृष्टीने हे चांगलेच ठरले आहे. स्मिथसुद्धा नेतृत्वाच्या जबाबदारीमुळे फलंदाज म्हणून जास्त एकाग्र झाला आहे. त्यामुळेच तो जागतिक क्रमवारीत अव्वल आहे. 

इतर प्रमुख मुद्यांवरील भाष्य असे - 
मालिकेतील आव्हान - प्रत्येक सामना, प्रत्येक मालिका महत्त्वाची. ही मालिका मोठी, ती छोटी असा विचार नाही. प्रत्येक प्रतिस्पर्धी संघ चांगलाच होता. ही मालिका इतर कोणत्याही मालिकेसारखीच आहे. 

ऑस्ट्रेलियन संघाचे स्वरूप - आम्हाला प्रतिस्पर्ध्याच्या संघाचे स्वरूप कसे याची काळजी नाही. आमच्या डावपेचांवर लक्ष केंद्रित. आमच्या कौशल्याची जाणीव आहे. आम्ही विशिष्ट तयारी केली आहे. 

प्रसिद्धीचा झोत - मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे प्रसिद्धी कशी हाताळायची, याचा विचार करायचा प्रश्नच येत नाही. मी मैदानावर उतरून माझे काम करतो. नेहमी खेळतो तशाच शैलीचे क्रिकेट खेळण्याचा माझा प्रयत्न असतो. वयानुसार तुम्ही परिपक्व बनता. काय करायचे आणि काय नाही, याची तुम्हाला जाणीव होत जाते. 

मी 22 वर्षांचा होतो तेव्हा 35 वर्षांच्या प्रौढासारखे परिपक्व असले पाहिजे अशी अपेक्षा बाळगली गेली, तसे घडले नाही. मला त्या प्रक्रियेतून जावे लागले. खेळाविषयी मला सदैव आत्मविश्वास वाटायचा. 
- विराट कोहली 

Web Title: Maintain respected opponent - virat