फाफ डू प्लेसिसचे शतक; भारतासमोर 270 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था
Thursday, 1 February 2018

डर्बन : डावाच्या सुरवातीच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले असले, तरीही कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या झुंजार शतकामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांमध्ये 269 धावा केल्या. डू प्लेसिसने एका बाजूने झुंज देत 120 धावा केल्या. 

डर्बन : डावाच्या सुरवातीच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले असले, तरीही कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या झुंजार शतकामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांमध्ये 269 धावा केल्या. डू प्लेसिसने एका बाजूने झुंज देत 120 धावा केल्या. 

डर्बनच्या या खेळपट्टीवर डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. पण हाशिम आमला आणि क्विंटन डिकॉक यांना डावाच्या सुरवातीला वेगाने धावा करता आल्या नाहीत. जसप्रित बुमराहने आमलाला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर डिकॉक आणि डू प्लेसिस यांनी 53 धावांची भागीदारी करत धावगती वाढविली. पुन्हा एकदा बुमराहनेच ही जोडी फोडली. 

Image may contain: 2 people, people playing sports, stadium and outdoor

या दरम्यान युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि केदार जाधव या फिरकी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जखडून ठेवले. एडन मार्कराम, जेपी ड्युमिनी आणि डेव्हिड मिलर हे धडाकेबाज फलंदाज झटपट बाद झाले. 

Image may contain: people playing sports and outdoor
जेपी ड्युमिनीचा कुलदीप यादवने त्रिफळा उडविला.

डावाच्या अखेरच्या टप्प्यात अष्टपैलू ख्रिस मॉरिस (37) आणि अँडी फेहलुख्वायो (नाबाद 27) यांनी डू प्लेसिसला साथ दिल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या अडीचशेच्या पुढे गेली. 

भारताकडून कुलदीप यादवने तीन गडी बाद केले. युझवेंद्र चहलने दोन, तर भुवनेश्‍वर कुमार आणि बुमराह यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. Yuzvendra Chahal of India bowling against South Africa in Durban

भारतीय संघाने या सामन्यासाठी अजिंक्‍य रहाणेला स्थान दिले. भारतीय संघ : 
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्‍य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्‍वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, युझवेंद्र चहल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news cricket Faf Du Plessis India versus South Africa