दक्षिण आफ्रिकेला पुन्हा दुखापतीचा फटका; डिकॉकही संघाबाहेर! 

वृत्तसंस्था
Monday, 5 February 2018

डर्बन : भारताविरुद्धच्या पहिल्या दोन्ही एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आज (सोमवार) आणखी एक धक्का बसला. यष्टिरक्षक आणि सलामीवीर क्विंटन डिकॉकचे मनगट दुखावले आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या उर्वरित मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली आहे. डेल स्टेन, एबी डिव्हिलियर्स आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस हे दक्षिण आफ्रिकेचे तीन महत्त्वाचे खेळाडू यापूर्वीच दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडले आहेत. 

सहा सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 0-2 अशा पिछाडीवर आहे. त्यात अनुभवी खेळाडूंच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील आव्हान टिकविण्यासाठी झगडावे लागणार आहे. अर्थात, डिव्हिलियर्स पहिल्या तीन सामन्यांसाठीच संघाबाहेर होता. चौथ्या सामन्यात त्याचे पुनरागमन होणे अपेक्षित आहे; तर डू प्लेसिसला उर्वरित सर्वच सामन्यांसाठी बाहेर बसावे लागणार आहे. 

क्विंटन डिकॉकच्या जागी दक्षिण आफ्रिकेने हेन्रिक क्‍लासेनला 16 जणांच्या संघात स्थान दिले आहे. क्‍लासेन अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. भारताविरुद्ध काल (रविवार) झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डिकॉकला दुखापत झाली. फलंदाजी करताना डिकॉकच्या डाव्या मनगटावर चेंडू जोरात आदळला होता. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागेल, असे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे फिजिओ डॉ. महंमद मुसाजी यांनी सांगितले. 

या दुखापतीमुळे डिकॉक उर्वरित एकदिवसीय मालिका आणि भारताविरुद्धची ट्‌वेंटी-20 मालिका खेळू शकणार नाही. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी डिकॉक पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय पथकाने व्यक्त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news cricket news India versus South Africa Quinton De Kock