भारतीय संघाचा विजयाचा निर्धार 

Wednesday, 7 February 2018

केप टाऊन : भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा चालू झाला तेव्हापासून केप टाऊन ते केप टाऊन प्रवास काय मजेदार झाला आहे. पहिल्या कसोटीत फिलॅंडरच्या सुंदर स्वींग गोलंदाजीने भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. यजमान संघाने सामना मोठ्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सामन्यात विकेट वेगवान गोलंदाजीला मदत करणारे नसूनही दक्षिण आफ्रिकन संघाने भारताला सहजी पराभूत केले. मनात चिंतेचे काहूर माजले होते की दौऱ्यात यजमान संघ विराट कोहलीच्या संघाला नाक पाण्याबाहेर काढायची संधी देणार की नाही. 

जोहान्सबर्ग कसोटीपासून क्रिकेटने मन बदलले. अचानक क्रिकेटने दक्षिण आफ्रिकन संघाकडे पाठ फिरवली जणू. तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने जिद्दीने खेळ करून नुसता विजय संपादला नाही तर परदेशात चांगला खेळ करायची हिंमत आमच्यात आहे असा संदेश दिला. एकदिवसीय मालिका चालू झाल्यावरच्या पहिल्या दोन सामन्यांत भारतीय खेळाडूंनी एकदम वरचढ खेळ करून भलेमोठे विजय हाती घेतले.

भारतीय फिरकी गोलंदाजीची दहशत दक्षिण आफ्रिकन फलंदाजांवर पसरली. ह्या अडचणी कमी होत्या की काय म्हणून यजमान संघातील एक एक करून तीन महत्त्वाचे फलंदाज दुखापतीने संघातून बाहेर गेले. डिव्हिलीयर्स आणि फाफ डू प्लेसी यांनंतर आता क्वींटन डिकॉक जायबंदी झाला आहे. मोठ्या समस्यांमधून मार्ग काढून यशाची लय सापडलेल्या भारतीय संघाला रोखायचे तरी कसे हे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर उभे ठाकले आहे. 

तिसरा सामना केप टाऊनच्या नितांत सुंदर न्युलॅंड्‌स मैदानावर बुधवारी होत असताना विराट संघात बदल करायचा विचार करत नसणार. वर्चस्व गाजवायची संधी असताना ती हातून घालवायची मानसिकता विराटची दिसत नाही. दक्षिण आफ्रिकन संघातून यष्टिरक्षक म्हणून हेनरिकस्‌ संघात येईल असे समजले. 

पहिल्या दोन सामन्यांत युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवने फलंदाजांसमोर निर्माण केलेल्या अडचणींचा विचार करून खेळपट्टी कमी गवत आणि भरपूर रोलींग करून फलंदाजीला पोषक करायचे सर्व प्रयत्न स्थानिक प्रशासन करत आहे. बुधवारच्या सामन्याची तिकिटे कधीच संपली असल्याचे संयोजकांनी हसत सांगितले. म्हणजेच बुधवारी सामन्याला मस्त वातावरण असणार हे नक्की आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news cricket news India versus South Africa Virat Kohli