डिव्हिलियर्सचे पुनरागमन; भारताची प्रथम फलंदाजी

शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. कसोटी मालिका गमाविल्यानंतरही भारतीय संघाने 'फिनिक्‍स' भरारी घेत मालिकेतील पहिले तीन सामने जिंकले. आता दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ एक विजय दूर आहे. 

प्रतिष्ठा जपण्यासाठी पहिले पाऊल उचलताना यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर प्रतिआक्रमणाचे आव्हान आहे. अर्थात, हे सगळे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून राहील. पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला नाही, तर कॅन्सर जनजागरणासाठी खेळला जाणारा सामना नक्कीच चुरशीचा होईल. 

सलग तीन पराभवाने दक्षिण आफ्रिका संघ मनातून नक्कीच खचला आहे. प्रत्येक सामन्यानंतर यजमान संघाचे खेळाडू नव्या उमेदीने मैदानात उतरले, पण प्रत्येक वेळी भारतीयांनी त्यांची फिरकी उडवली आहे. गेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना केदार जाधवला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला या सामन्यासाठी संघाबाहेर जावे लागले. केदार जाधवच्या जागी श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळाले आहे.

प्रतिआक्रमण करण्याची ताकद दक्षिण आफ्रिका संघात असली तरी, ती अजून दिसलेली नाही. प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त झालेल्या यजमान संघाला एबी डिव्हिलर्स संघात परतल्याचा दिलासा आहे. भेदरलेल्या खेळाडूंना यशाचा मार्ग डिव्हिलर्स दाखवू शकतो, अशी आशा दक्षिण आफ्रिका क्रिकेट चाहत्यांना आहे. 

कसोटी सामन्यासाठी वॉंडरर्सची खेळपट्टी हिरवीगार ठेवण्यात आली होती. एकदिवसीय क्रिकेटमधील मारधाड प्रवृत्ती लक्षात घेता या वेळी तीच खेळपट्टी पाटा करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेने या वेळी सरावात देशातील उपलब्ध फिरकी गोलंदाजांना बोलावून सराव केला. किमान या वेळी तरी भारतीय फिरकीसमोर उभे राहायचे असा त्यांचा मनोदय दिसून येत आहे. त्यानंतरही तुफान सुटलेल्या विराट कोहलीला कसे रोखायचे, याचे वेगळे नियोजन त्यांना करावे लागेल. 

सलग तीन सामन्यांत सपाटून पराभव झाल्याने दडपण प्रचंड आहे. आम्ही भारतीय फिरकीला खेळताना सामन्यातील खराब परिस्थितीमुळे सावध पवित्र्यात राहिलो आहोत. चौथ्या सामन्यात चांगली सुरवात करून जर सकारात्मक परिस्थितीत फिरकीला सामोरे जाण्याचा प्रसंग आला तर चित्र वेगळे दिसेल. 
- ख्रिस मॉरिस 

भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, युझवेंद्र चहल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news cricket news India versus South Africa Virat Kohli