डिकाॅकची झुंज अपयशी; आॅस्ट्रेलियाचा 118 धावांनी विजय

वृत्तसंस्था
Monday, 5 March 2018

डर्बन : केवळ अपुऱ्या प्रकाशामुळे चौथ्या कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ थांबवावा लागल्याने ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजयाच्या औपचारिकतेसाठी पाचव्या दिवशी मैदानावर उतरावे लागले. अर्थात विजयासाठी त्यांना फार प्रयत्न करावे लागले नाहीत. काल कडवी झुंज देणारा क्विंटन डिकाॅक दोन धावा काढून बाद झाला आणि आॅस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 9 बाद 293 धावा केल्या होत्या. डिकॉक 81, तर मॉर्केल शून्यावर खेळत होते. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 118 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

विजयासाठी 417 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आघाडीची फळी गारद होऊनही अँडिल मार्करम आणि क्विंटॉन डिकॉक यांच्या प्रतिकारामुळे दक्षिण आफ्रिकेने सामन्यातील रंगत कायम राखली होती. 

सलामीचा फलंदाज मार्करमची शतकी खेळी आणि त्याला डिकॉकने दिलेल्या साथीमुळे दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 49 वरून डाव सावरला होता. पाच गडी बाद झाल्यानंतर या जोडीने दाखवलेल्या झुंजार खेळाने त्यांच्यासमोरील आव्हान 134 धावांपर्यंत कमी झाले होते. मात्र, नोव्हेंबर 2016 पासून कसोटीत विकेट मिळवू न शकलेल्या मिशेल मार्शने मार्करमची (143) विकेट मिळवून ऑस्ट्रेलियाच्या मार्गातील अडथळा दूर केला. मार्करम आणि डिकॉक जोडीने 147 धावांची भागीदारी केली. मार्करम बाद झाल्यावर मिशेल स्टार्कने त्यांच्या तळातील फलंदाजांना एकामागून एक बाद केले. केशव महाराज आणि रबाडा यांना पाठोपाठ बाद केल्यानंतर आलेल्या मॉर्केलने स्टार्कची हॅटट्रिक हुकवली. तेव्हाच प्रकाश कमी होण्यास सुरवात झाली होती; पण लियॉन आणि स्वतः कर्णधार स्मिथ यांनी नऊ षटके टिच्चून मारा केला. अखेरीस पंचांनी अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवला होता.

संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया 351 आणि 227 वि. दक्षिण आफ्रिका 162 आणि 298 (मार्करम 143, डिकॉक 83, स्टार्क 4-74). 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news cricket news South Africa versus Australia