असभ्य वर्तनाबद्दल डेव्हिड वॉर्नरला दंड

वृत्तसंस्था
Thursday, 8 March 2018

डर्बन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ड्रेसिंगरूममधील डॉ. कॉकबरोबर झालेल्या वादात आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला दोषी धरले असून, त्याला आर्थिक दंड करण्यात आला आहे. 

वॉर्नरने झाल्या प्रकरणाबद्दल चौकशी समितीसमोर आपली चूक मान्य केल्याचे आयसीसीने म्हटले आहे. त्यामुळे त्याचा दुसरा कसोटी सामना खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षा म्हणून त्याच्या मानधनातील 75 टक्के रक्‍कम दंड म्हणून वसूल करण्यात येईल. 

सामन्याच्या चौथ्या दिवशी ड्रेसिंगरूममध्ये परतत असताना जिन्यातच वॉर्नर आणि कूक यांच्यात वादावादी झाली होती. वाद भडकण्यापूर्वी सहकारी उस्मान ख्वाजा आणि नॅथन लियॉन यांनी वॉर्नरला दूर केले होते. कर्णधार स्मिथही मध्ये पडला होता. चौकशी समितीसमोर वॉर्नरने आचारसंहितेचा (लेव्हल 2) भंग केल्याचे मान्य केले. त्यामुळे त्याच्यावरील संभाव्य निलंबनाची कारवाई टळली. दंडाबरोबरच त्याच्या नावावर तीन दोषांकही जोडले गेले आहे. 

या प्रकरणात डी कॉक याच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत. पण, त्याची चौकशी बुधवारी उशिरा करण्यात येणार आहे. दरम्यान, याच सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्तन वादग्रस्त ठरले होते. डिव्हिलर्सला धावबाद करताना हातातील चेंडू जाणूनबुजून फेकताना लियॉनने टाकलेला चेंडू डिव्हिलर्सच्या छातीवर आदळला होता. या प्रकरणी लियॉनला 15 टक्के दंड करण्यात आला आहे. 

मैदानावर आक्रमक राहण्यासाठी कर्णधार स्मिथ आणि प्रशिक्षक लीमन वॉर्नरला उद्युक्त करीत आहेत. पहिल्या कसोटीत झालेली घटना दुर्दैवीच होती. यामध्ये वॉर्नरच नाही, तर स्मिथ आणि लीमन यांच्यावरही बंदी यायला हवी होती. 
- इयान चॅपेल, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news David Warner quinton de kock