भारतीय गोलंदाज चमकले; आफ्रिकेला 194 धावांत गुंडाळले! 

वृत्तसंस्था
Thursday, 25 January 2018

जोहान्सबर्ग : फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीनंतर गोलंदाजांनी प्रभावी मारा करत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला विजयाची अंधूक संधी निर्माण केली. भारतीय वेगवान गोलंदाजांनी आज (गुरुवार) दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 194 धावांतच गुंडाळला. यामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात अवघ्या सात धावांची नाममात्र आघाडी मिळाली. 

भारताकडून जसप्रित बुमराहने पाच गडी बाद केले. पुनरागमन केलेल्या भुवनेश्‍वर कुमारने तीन, तर ईशांत शर्मा आणि महंमद शमीने प्रत्येकी एक गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर 16 धावांमध्येच परतले होते.

'नाईट वॉचमन' म्हणून मैदानात उतरलेल्या कागिसो रबाडाने भारतीय गोलंदाजांची परीक्षाच पाहिली. त्याने 84 चेंडू खेळून काढत 30 धावा केल्या. हाशिम आमलाबरोबर त्याने तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. 

दोन सामन्यांच्या 'विश्रांती'नंतर भारतीय संघात परतलेल्या अजिंक्‍य रहाणेने क्षेत्ररक्षणातील त्याचे महत्त्व दाखवून दिले. ईशांत शर्माच्या एका चांगल्या चेंडूवर रबाडाचा उडालेला झेल रहाणेने कौशल्याने टिपला. ही जोडी फोडल्यानंतर भारतीय गोलंदाजांची आक्रमकता अधिकच वाढली.

अनुभवी एबी डिव्हिलियर्सला बाद करताना भुवनेश्‍वर कुमारने टाकलेला चेंडू अप्रतिमच होता. त्यानंतर बुमराहचा एक आत आलेला चेंडू सोडताना कर्णधार फाफ डू प्लेसिसचा अंदाज चुकला आणि त्याचा त्रिफळा उडाला.

यानंतर व्हरनॉन फिलॅंडरचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाज झटपट बाद झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Jasprit Bumrah shines as India restricts South Africa in third test