esakal | कुंबळेपेक्षा एक कमी विकेट होताच निवृत्त होईन : अश्‍विन 
sakal

बोलून बातमी शोधा

R Ashwin

कुंबळेपेक्षा एक कमी विकेट होताच निवृत्त होईन : अश्‍विन 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आपले दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी 619 कसोटी विकेटचा विक्रम केलेला आहे. त्यांचा हा विक्रम मोडण्याचा मी कधीच विचार केलेला नाही. जेव्हा कधी मी 618 विकेट मिळवेन, तो माझा अखेरचा कसोटी सामना असेल, असे आदरयुक्त मत आर. अश्‍विनने व्यक्त केले. 

कुंबळेबाबत आदर व्यक्त करताना अश्‍विनने श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज रंगाना हेराथला आपल्या रोल मॉडेलपैकी एक असल्याचे संबोधले. 39 वर्षीही तो प्रगती करत आहे.

अश्‍विन सध्या एकदिवसीय संघातून बाहेर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर आता न्यझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी देण्यात आलेली नाही, या संदर्भात विचारले असता अश्‍विनने या विषयावर बोलण्यास नकार दिला; परंतु प्रत्येक दिवसाचा मी माझ्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी उपयोग करत आहे, असे मत मांडले.