esakal | क्रिकेट : धवनचे संघात पुनरागमन; भारताचे प्रथम क्षेत्ररक्षण 
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेट : धवनचे संघात पुनरागमन; भारताचे प्रथम क्षेत्ररक्षण 

क्रिकेट : धवनचे संघात पुनरागमन; भारताचे प्रथम क्षेत्ररक्षण 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्‌वेंटी-20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत वर्चस्व राखल्यानंतर आता विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ट्‌वेंटी-20 मालिकेतही याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहे. 

रांचीमध्ये आज (शनिवार) दिवसभर पावसाळी वातावरण होते. यामुळे कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. एकदिवसीय मालिका 1-4 अशी गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला ट्‌वेंटी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच धक्का बसला. सूर गवसलेला कर्णधार स्टीव्ह स्मिथ खांद्याच्या दुखापतीमुळे मायदेशी परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व डेव्हिड वॉर्नरकडे सोपविण्यात आले आहे. 

भारतीय संघात अपेक्षेनुसार शिखर धवनचे पुनरागमन झाले; तर अनुभवी गोलंदाज आशिष नेहराला या सामन्यासाठी संघात स्थान मिळाले नाही. 

भारतीय संघ : 
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्‍वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह. 

ऑस्ट्रेलिया संघ : 
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), ऍरॉन फिंच, ग्लेन मॅक्‍सवेल, ट्रॅव्हिस हेड, मोझेस हेन्रिकेज, डॅनियल ख्रिस्तियन, टीम पेनी (यष्टिरक्षक), नॅथन कुल्टर-नाईल, अँड्रयू टाय, ऍडम झम्पा, जेसन बऱ्हेनड्रॉफ. 

loading image