भारताला टी- 20 मालिका जिंकण्याची संधी 

वृत्तसंस्था
Saturday, 4 November 2017

राजकोट : पाच वर्षांत तिसऱ्या टी- 20 मालिकेचे विजेतेपद मिळविण्याची भारताला चांगली संधी असली, तरी झुंजार वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या न्यूझीलंडकडून या सामन्यात प्रतिआक्रमणाची अपेक्षा बाळगली जात आहे. 

पहिल्या टी- 20 सामन्यात भारताने 53 धावांनी सहज विजय मिळविला. आता दुसरा सामना जिंकून येथेच मालिका विजय साकार करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील. 

राजकोट : पाच वर्षांत तिसऱ्या टी- 20 मालिकेचे विजेतेपद मिळविण्याची भारताला चांगली संधी असली, तरी झुंजार वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या न्यूझीलंडकडून या सामन्यात प्रतिआक्रमणाची अपेक्षा बाळगली जात आहे. 

पहिल्या टी- 20 सामन्यात भारताने 53 धावांनी सहज विजय मिळविला. आता दुसरा सामना जिंकून येथेच मालिका विजय साकार करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील. 

शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीने केलेल्या जबरदस्त फलंदाजीनेच भारताचा पहिल्या सामन्यात विजय लिहिला गेला. अर्थात, भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रित बुमरा यांची अखेरच्या टप्प्यातील गोलंदाजीदेखील चांगली झाली. डावाच्या मध्यात फिरकी गोलंदाजांनीही चमक दाखवली. त्यामुळे सर्वच आघाड्यावर सर्वोत्तम कामगिरी करून भारताने पहिल्या सामन्यात आपले वर्चस्व राखले होते. 

न्यूझीलंडला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यांची झुंजार वृत्ती सर्वांना माहीत आहे. त्यांच्यात मुसंडी मारण्याची क्षमता आहे. पण, या वेळी त्यांच्या खेळाडूंना त्यासाठी आपला खेळ सर्वच आघाड्यांवर उंचवावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात त्यांच्या ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदी यांच्या गोलंदाजीत शिस्तीचा अभाव होता. अखेरच्या टप्प्यात या दोन्ही प्रमुख गोलंदाजांना आपल्या यॉर्करच्या अस्त्राचा योग्य वापर करता आला नाही. तुलनेत याच टप्प्यात भारताचे भुवनेश्‍वर आणि बुमरा कमालीचे यशस्वी ठरले. पहिल्या सामन्यातील दोन्ही संघाच्या कामगिरीत हाच मुख्य फरक होता. 

भारतीय संघाचे सध्याचे वैशिष्ट्य म्हणजे आघाडीच्या फळीतील एक फलंदाज खेळला नाही, तर दुसरा ती उणीव भरून काढतो. तोदेखील खेळला नाही, तर मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाज सज्ज असतात. त्यामुळे भारतीय संघाची नाव अगदी कठिण परिस्थितीतूनही सहीसलामत तीराला लागत आहे.

न्यूझीलंडकडून आतापर्यंत मालिकेत टॉम लॅथम यालाच भारतीय गोलंदाजीसमोर आत्मविश्‍वासाने उभे राहता आले आहे. भारतीय फिरकी गोलंदाजीचा अंदाज घेण्यात त्यांचे फलंदाज अपयशी ठरत आहेत. त्यामुळे मुसंडी मारण्याची कितीही क्षमता न्यूझीलंडकडे असली, तरी त्यांना प्रत्येक आघाडीवर आपला खेळ उंचवावा लागणार हे निश्‍चितच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news cricket news India versus New Zealand