सामन्यातील परिस्थितीनुसार बदलते फलंदाजीची क्रमवारी : साहा 

वृत्तसंस्था
Wednesday, 22 November 2017

नागपूर : भारतीय कसोटी क्रिकेट संघातील फलंदाजीची क्रमवारीत संघ व्यवस्थापन नवनवीन प्रयोग करत आहे. मात्र, यष्टिरक्षक वृद्धिमान साहाला या सततच्या बदलत्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात कोणतीही अडचण येत नाही. 'सामन्यातील परिस्थितीनुसार फलंदाजीची क्रमवारी बदलली जाऊ शकते. या संघात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी अनेक खेळाडू सज्ज आहेत', असे मत साहाने मांडले. 

भारत आणि श्रीलंकेदरम्यान दुसरी कसोटी नागपूरमध्ये होणार आहे. पहिल्या कसोटीत अपुऱ्या प्रकाशल्ने भारताची विजयाची संधी हिरावली होती. या सामन्यात साहा पहिल्या डावात सातव्या आणि दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. यापूर्वी काही सामन्यांमध्ये साहा सहाव्या क्रमांकावरही फलंदाजी केली होती. 

'माझ्या फलंदाजीचा क्रमांक नेहमीच निश्‍चित असतो, असं नाही. कधी सातव्या, कधी आठव्या, तर कधी सहाव्या क्रमांकावरही फलंदाजी केली आहे. मी, आश्‍विन आणि रवींद्र जडेजा अशा आमच्या तिघांमध्ये परिस्थितीनुसार आणि प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीनुसार फलंदाजीचा क्रमांक ठरतो', असे साहाने सांगितले. 

सध्याच्या भारतीय संघात सलामीसाठी मुरली विजय, शिखर धवन आणि के. एल. राहुल असे तीन पर्याय आहेत. त्यानंतर 'वन-डाऊन'ची जागा चेतेश्‍वर पुजारा, चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्‍य रहाणे अशी क्रमवारी आहे. पूर्वीच्या संघात व्हीव्हीएस लक्ष्मण सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस येत असे. त्याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघातील ही जागा विविध फलंदाजांना देण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news cricket news India versus Sri Lanka Wriddhiman Saha