भारत-श्रीलंका 'वन-डे'वर पावसाचे सावट 

वृत्तसंस्था
Saturday, 9 December 2017

धरमशाला : भारत आणि श्रीलंकेदरम्यान उद्यापासून (रविवार) सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वत्र पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्‍यता राज्याच्या हवामान विभागाने काल (शुक्रवार) वर्तविली आहे. 

धरमशाला : भारत आणि श्रीलंकेदरम्यान उद्यापासून (रविवार) सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वत्र पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्‍यता राज्याच्या हवामान विभागाने काल (शुक्रवार) वर्तविली आहे. 

भारत आणि श्रीलंकेमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्या धरमशाला येथे होणार आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला असला, तरीही हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे अधिकारी मात्र सामन्याच्या आयोजनात कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्‍वास व्यक्त करत आहेत. 'सामन्याच्या आधी किंवा सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा आलाच, तर मैदान पूर्ववत करण्यासाठी तीन 'सुपर सोकर्स' सज्ज आहेत', असे हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे माध्यम व्यवस्थापक मोहित सूद यांनी सांगितले. 

या मालिकेसाठी विराट कोहलीला संघ व्यवस्थापनाने विश्रांती दिली आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्त्व रोहित शर्माकडे सोपविण्यात आले आहे. 

भारतीय संघ : 
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रित बुमराह, युझवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, केदार जाधव, दिनेश कार्तिक, सिद्धार्थ कौल, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, अजिंक्‍य रहाणे. 

श्रीलंकेचा संघ : 
थिसरा परेरा (कर्णधार), दुष्मंता चमिरा, अकिला धनंजय, धनंजय डिसिल्वा, चतुरंगा डिसिल्वा, निरोशन डिकवेला (यष्टिरक्षक), नुवान प्रदीप, असेला गुणरत्ने, दानुष्का गुणतिलका, सुरंगा लकमल, अँजेलो मॅथ्यूज, सचिथ पथिराना, कुशल परेरा, सदीरा समरविक्रमा, उपुल थरंगा, लाहिरु थिरिमन्ने.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news cricket news India versus Sri Lanka Dharamshala ODI