esakal | भारताविरुद्धच्या ट्‌वेंटी-20 मालिकेतून लसिथ मलिंगाला वगळले 
sakal

बोलून बातमी शोधा

File photo of Lasith Malinga

भारताविरुद्धच्या ट्‌वेंटी-20 मालिकेतून लसिथ मलिंगाला वगळले 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलंबो : भारताविरुद्धच्या आगामी ट्‌वेंटी-20 मालिकेतून श्रीलंकेने अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला वगळले. भारताविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सुरंगा लकमललाही विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. 

तीन सामन्यांच्या मालिकेसाठीच्या श्रीलंकेच्या संघाची घोषणा काल (शुक्रवार) झाली. 'मलिंगाला न मिळालेले स्थान' हाच या संघनिवडीतील चर्चेचा विषय होता. मात्र, 'मलिंगाला वगळले नसून त्याला विश्रांती देण्यात आली आहे' असे निवड समितीने वारंवार सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून मलिंगा दुखापतींनी त्रस्त आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पुनरागमन केल्यानंतर त्याला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. 

गुडघ्याच्या दुखापतीमुळे जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर मलिंगाने या वर्षाच्या सुरवातीस श्रीलंकेच्या संघात पुनरागमन केले होते. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडीसाठी उपलब्ध असूनही मलिंगाचा विचार निवड समितीने केला नव्हता. त्याऐवजी श्रीलंकेने तरुण खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. 

या मालिकेतील पहिला ट्‌वेंटी-20 सामना 20 डिसेंबर रोजी कटकमध्ये होणार आहे. दुसरा सामना 22 डिसेंबर रोजी इंदूरमध्ये, तर तिसरा आणि अंतिम सामना 24 डिसेंबर रोजी मुंबईत होईल.

loading image
go to top