आश्विनची विक्रमी फिरकी अन् 'टीम इंडिया'ची भरारी

Monday, 27 November 2017

नागपूर : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 239 धावांनी विजय मिळवीत मालिकेत आघाडी घेतली. 

भारताच्या या विजयातील वैशिष्ट्ये 

नागपूर : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 239 धावांनी विजय मिळवीत मालिकेत आघाडी घेतली. 

भारताच्या या विजयातील वैशिष्ट्ये 

 • कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा सर्वांत मोठा विजय
 • यापूर्वी बांगलादेशविरुद्धही 1 डाव आणि 239 धावांनी विजय
 • भारतात खेळताना श्रीलंकेचा संघ 11 व्यांदा कसोटीत पराभूत
 • श्रीलंकेचा कसोटी कारकिर्दीतील हा सर्वांत मोठा पराभव
 • 9 वेळा भारताकडून श्रीलंकेचा डावाने पराभव
 • विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने एकही मालिका नाही गमावली
 • विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार
 • कोहलीने पाचव्यांदा झळकाविले द्विशतक
 • यापूर्वी 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघाने भारत दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना अनिर्णित आणि दुसरा डावाने गमाविला होता
 • कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद 300 बळी 

भारताचा फिरकीपटू आर. आश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये जलद तीनशे बळी मिळविण्याची कामगिरी केली. त्याने 54 कसोटी सामन्यात 300 बळी घेत 36 वर्षे जुना डेनिस लिली यांचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे 27 नोव्हेंबरलाच लिली यांनी हा विक्रम केला होता.

कसोटीत जलद 300 बळी मिळविणारे पाच गोलंदाज

 • आर. आश्विन (54 सामने)
 • डेनिस लिली (56 सामने)
 • मुथय्या मुरलीधरन (58 सामने)
 • रिचर्ड हेडली (61 सामने)
 • माल्कन मार्शल (61 सामने)

कोहलीच्या नेतृत्वाखाली 31 पैकी 20 कसोटीत विजय
कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या 31 कसोटींपैकी 20 सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळविला आहे. यशस्वी कर्णधारांच्या यादीत कोहली तिसऱ्या स्थानावर आहे

31 कसोटीत सर्वाधिक विजय मिळविणारे कर्णधार 

 • रिकी पाँटिंग 23 (3 पराभव)
 • स्टीव्ह वॉ 21 (5 पराभव)
 • विराट कोहली 20 (3 पराभव)
 • मायकेल वॉन 19 (5 पराभव)

कसोटी क्रिकेटमध्ये 2016 पासून सर्वाधिक विजय

 • भारत (16 विजय)
 • इंग्लंड/दक्षिण आफ्रिका (11 विजय)
 • श्रीलंका/ऑस्ट्रेलिया (9 विजय)
 • न्यूझीलंड/पाकिस्तान (6 विजय)
 • वेस्ट इंडीज (4 विजय)

कसोटी क्रिकेटमध्ये जलद बळी घेणारे गोलंदाज

 • 50 बळी - चार्ल्स टर्नर (ऑस्ट्रेलिया)
 • 100 बळी - जॉर्ज लोहमन (ऑस्ट्रेलिया)
 • 150 बळी - सँडी बर्नर्स (इंग्लंड)
 • 200 बळी - क्लॅरी ग्रिमेट (ऑस्ट्रेलिया)
 • 250 बळी - आर. आश्विन (भारत)
 • 300 बळी - आर. आश्विन (भारत)
 • 350 बळी - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
 • 400 बळी - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
 • 450 बळी - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
 • 500 बळी - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
 • 550 बळी - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
 • 600 बळी - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
 • 650 बळी - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
 • 700 बळी - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
 • 750 बळी - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
 • 800 बळी - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

 • अनिल कुंबळे - 953 बळी
 • हरभजनसिंग - 707 बळी
 • कपिल देव - 687 बळी
 • झहीर खान - 597 बळी
 • जवागल श्रीनाथ - 551 बळी
 • आर. आश्विन - 501 बळी

एका वर्षात सर्वाधिक शतके करणारे खेळाडू

 • सचिन तेंडुलकर - 12 शतके
 • रिकी पाँटिंग - 11 शतके
 • अरविंदा डिसिल्वा - 10 शतके
 • राहुल द्रविड - 10 शतके
 • तिलकरत्ने दिलशान - 10 शतके
 • हाशिम आमला - 10 शतके
 • विराट कोहली - 10 शतके

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news cricket news India versus Sri Lanka R Ashwin Virat Kohli