बीसीसीआयकडून धोनीची 'पद्मभूषण'साठी शिफारस 

वृत्तसंस्था
Wednesday, 20 September 2017

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी याची 'पद्मभूषण' या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. 

'पद्म' पुरस्कारासाठी एकच नाव पाठवण्यात आले असून, त्यात धोनीच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे 'बीसीसीआय'च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्याच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड योग्य असल्याचे 'बीसीसीआय'चे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी सांगितले. 

दोन विश्‍वकरंडक स्पर्धा (2011 एकदिवसीय आणि 2007 टी-20) जिंकणारा धोनी एकमेव भारतीय कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्या नावाला विरोध व्हायचा प्रश्‍नच नव्हता, असे सांगून खन्ना म्हणाले, ''धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 90 कसोटी क्रिकेट सामनेही खेळले आहेत. एवढी अजोड कारकीर्द एखादाच खेळाडू घडवू शकतो.'' 

धोनीने 302 एकदिवसीय सामने खेळताना 9,737, तर 90 कसोटी सामने खेळताना 4,876 आणि 78 टी 20 सामने खेळताना 1,212 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षक म्हणून त्याने कसोटी 256, एकदिवसीय सामन्यात 285 आणि टी-20 मध्ये 43 असे एकूण 584 झेल घेतले आहेत. त्याने 163 फलंदाजांना यष्टिचीतदेखील केले असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकांचे शतकही पूर्ण केले आहे. 

अकरावा क्रिकेटपटू ठरणार 
धोनीला 'पद्म' पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यास, असा बहुमान मिळविणारा तो 11वा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वी सचिन तेंडुलकर, कपिल देव, सुनील गावसकर, राहुल द्रविड, चंदू बोर्डे, प्रा. दि. ब. देवधर, कर्नल सी. के. नायडू, लाला अमरनाथ, राजा भालिंदर सिंग, विजय आनंद यांना 'पद्मभूषण' सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news cricket news MS Dhoni BCCI