esakal | 2023 चा 'वर्ल्ड कप' भारतात; पाच वर्षांत भारत खेळणार 306 दिवस क्रिकेट 
sakal

बोलून बातमी शोधा

2023 चा 'वर्ल्ड कप' भारतात; पाच वर्षांत भारत खेळणार 306 दिवस क्रिकेट 

2023 चा 'वर्ल्ड कप' भारतात; पाच वर्षांत भारत खेळणार 306 दिवस क्रिकेट 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : खुद्द कर्णधार विराट कोहलीनेच जाहीररित्या मांडल्यामुळे चर्चेत आलेल्या अतिक्रिकेटच्या मुद्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विशेष सर्वसाधारण बैठकीत पडसाद उमटले आणि भारतीय संघाला पुढील चार वर्षांच्या व्यग्र वेळापत्रकात 84 दिवसांची अधिक विश्रांती मिळणार आहे. 

2019 ते 2023 या कालावधीतील भारतामध्ये एकूण 81 आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. 2015 ते 2019 या कालावधीतील आंतरराष्ट्रीय सामन्यांपेक्षा ही संख्या 30 ने जास्त आहे. मात्र, प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्याचे दिवस कमी होणार आहेत. गेल्या पंचवार्षिक नियोजनामध्ये भारतीय संघाला 390 दिवस क्रिकेट खेळावे लागले होते. पुढील पंचवार्षिक योजनेमध्ये भारतीय संघ 306 दिवस क्रिकेट खेळणार आहे. 

'बीसीसीआय'ची विशेष सर्वसाधारण बैठक आज (सोमवार) झाली. यामध्ये खेळाडूंच्या मानधनापासून पुढील पंचवार्षिक नियोजनाचा मुद्दा चर्चेत होता. या कालावधीमध्ये भारतीय संघाच्या ट्‌वेंटी-20 सामन्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच, या पाच वर्षांमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या ताकदवान संघांबरोबर जास्त कसोटी सामने खेळणार आहे. दुबळ्या संघांविरुद्धच्या सामन्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. अर्थात, बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये या सर्व सामन्यांची नेमकी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. कसोटी आणि ट्‌वेंटी-20 सामन्यांवर जास्त भर देण्यात आल्याने द्विपक्षीय एकदिवसीय मालिकांची संख्याही कमी होणार आहे. 

तसेच, 2019 ते 2023 या कालावधीमध्ये भारतामध्ये चॅंपियन्स करंडक आणि विश्‍वकरंडक स्पर्धेचे आयोजनही होणार आहे. चॅंपियन्स करंडक स्पर्धा 2021 मध्ये, तर विश्‍वकरंडक स्पर्धा 2023 मध्ये होईल. 

loading image