'किंग्ज इलेव्हन पंजाब'च्या प्रशिक्षकपदी ब्रॅड हॉज 

वृत्तसंस्था
Thursday, 14 December 2017

मोहाली : 'इंडियन प्रीमिअर लीग'च्या (आयपीएल) आगामी मोसमासाठी 'किंग्ज इलेव्हन पंजाब' संघाच्या प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज ब्रॅड हॉज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन मोसमांमध्ये ब्रॅड हॉज 'गुजरात लायन्स'चे प्रशिक्षक होते. हा संघ आता आगामी 'आयपीएल'मध्ये नसेल. 

हॉज यांच्या मार्गदर्शनाखाली 'गुजरात लायन्स'ने 2016 मध्ये गुणतक्‍त्यात पहिले स्थान पटकाविले होते; पण यंदा या संघाला चारच विजय मिळविता आले. यंदाच्या 'आयपीएल'मध्ये 'गुजरात लायन्स' गुणतक्‍त्यात शेवटून दुसऱ्या स्थानी होते. 

42 वर्षीय हॉज यांना प्रशिक्षणात साह्य करण्यासाठी दिल्लीचा माजी फलंदाज मिथून मन्हास आणि जे. अरुणकुमार यांचीही निवड झाली आहे. 'किंग्ज इलेव्हन पंजाब'चे संचालक म्हणून भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग काम पाहत आहेत. संजय बांगर यांची भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याने त्यांनी पंजाबच्या संघाचे प्रशिक्षकपद गेल्या वर्षी सोडले. त्यामुळे गेल्या वर्षी सेहवाग यांनीच धुरा सांभाळली होती. 

'आयपीएल'मध्ये हॉज यांनी यापूर्वी 'कोची टस्कर्स केरळ', 'कोलकाता नाईट रायडर्स' आणि 'राजस्थान रॉयल्स'कडून फलंदाज म्हणून चांगली कामगिरी बजावली होती. ट्‌वेंटी-20 मध्ये सात हजारांहून अधिक धावा करणाऱ्या मोजक्‍या आठ फलंदाजांमध्ये हॉज यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियातील ट्‌वेंटी-20 मालिकेमध्ये ते अजूनही खेळाडू म्हणून सहभागी होत असले, तरीही 2014 मध्येच त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे. हॉज यांनी सहा कसोटी, 25 एकदिवसीय आणि 15 ट्‌वेंटी-20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news IPL News Kings Eleven Punjab Brad Hodge Virender Sehwag