आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रशीद खान सर्वांत युवा कर्णधार 

वृत्तसंस्था
Monday, 5 March 2018

नवी दिल्ली : विश्‍वकरंडक पात्रता फेरीत अफगाणिस्तानचे कर्णधारपद भूषविणारा रशीद खान हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वांत तरुण कर्णधार ठरला. 

आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल आणि एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या रशीदची अपघातानेच अफगाणिस्तानच्या कर्णधारपदी वर्णी लागली. कर्णधार असगर स्टॅनिकझई याला अपेडिंक्‍स झाल्याचे निदान झाल्यामुळे रशीदला स्कॉटलंडविरुद्ध कर्णधार करण्यात आले. रशीदचे वय 19 वर्षे आणि 165 दिवस आहे. 

यापूर्वीचा विक्रम बांगलादेशाच्या राजिन सालेह याच्या नावावर होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात कर्णधारपद भूषविले तेव्हा तो 20 वर्षे 297 दिवस वयाचा होता. 

असे आहेत युवा कर्णधार 
कसोटी :

  • तातेंदा तैबू (झिंबाब्वे) 20 वर्षे 358 दिवस
  • मन्सूर अली खान पतौडी (भारत, 21 वर्षे 77 दिवस) 

एकदिवसीय :

  • सचिन तेंडुलकर (भारत, 23 वर्षे 126 दिवस) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Rashid Khan afghanistan cricket