सलग दुसऱ्या 'वन-डे'त इंग्लंडचा कांगारूंवर विजय 

पीटीआय
Saturday, 20 January 2018

ब्रिस्बेन : ज्यो रुटच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलियावर विजय मिळविला. त्यांनी 4 गडी राखून विजय मिळवताना पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली. 

प्रथम फलंदाजी करताना ऍरॉन फिंचच्या (106) शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरवात मिळाली होती. पण, मधल्या फळीने फिरकी गोलंदाजांपुढे नांगी टाकल्यामुळे त्यांचे आव्हान 270 धावांपर्यंत मर्यादित राहिले. इंग्लंड कर्णधार इयॉन मॉर्गनने ऑफ स्पिनर म्हणून ज्यो रुटचा केलेला वापर निर्णायक ठरला. 

आव्हानाचा पाठलाग करताना स्टार्क आणि रिचर्डसन वगळता ऑस्ट्रेलियाचे अन्य गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकले नाही. पहिल्या सामन्यातील तुफानी खेळ दाखवण्यात रॉय अपयशी ठरला; पण बेअरस्टॉ, हेल्स यांनी अर्धशतके झळकावत धावांची गती राखली. रुटने बटलर आणि वोक्‍सला साथीला घेत वेग कायम राखला आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडने 44.2 षटकांतच 6 बाद 274 धावा केल्या. 

ऑस्ट्रेलियाची चुकलेली संघनिवड आता चर्चेचा विषय ठरली आहे. जास्तीचा गोलंदाज खेळविण्याची चूक त्यांना चांगलीच महागात पडली. त्यामुळे चांगली सुरवात मिळूनही खोलवर फलंदाजी नसल्यामुळे त्यांचे आव्हान भक्कम होऊ शकले नाही. ऍरॉन फिंचने सलग दुसरे शतक झळकावले. पण, अन्य फलंदाज प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. त्यानंतर मिशेल स्टार्कने भेदक गोलंदाजी केली. पदार्पणात ह्ये रिचर्डसन याने प्रभाव पाडला. पण, इंग्लंडला अडचणीत आणू शकतील इतक्‍या धावा ते करू शकले नाहीत. इंग्लंडची असलेली खोलवर फलंदाजी हाच या सामन्यातील महत्वाचा फरक ठरला. जॉनी बेअर स्टॉन, ऍलेक्‍स हेल्स यांच्याबरोबर ज्यो रुट आणि ख्रिस वोक्‍स यांनी बहुमोल योगदान देत 34 चेंडूं शिल्लक ठेवूनच इंग्लंडला विजयी केले. इंग्लंडने तब्बल दोन दशकांनंतर या मैदानावर एकदिवसीय सामना जिंकला. 

संक्षिप्त धावफलक 
ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 9 बाद 270
(ऍरॉन फिंच 106 -114 चेंडू, 9 चौकार, 1 षटकार, मिशेल मार्श 36, कॅरे 27, ज्यो रुट 2-31, आदिल रशीद 2-71) पराभूत वि. इंग्लंड 44.2 षटकांत 6 बाद 274 (जॉनी बेअरस्टॉ 60, ऍलेक्‍स हेल्स 57, ज्यो रुट नाबाद 46, जोस बटलर 42, ख्रिस वोक्‍स नाबाद 39, मिशेल स्टार्क 4-59, रिचर्डसन 2-57)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news Australia versus England Joe Root