'थलैवा' स्टाईलमध्ये धोनीकडून 'चेन्नई'चे स्वागत 

वृत्तसंस्था
रविवार, 16 जुलै 2017

रांची : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज म्हणजे महेंद्रसिंह धोनी असे समीकरण चेन्नई संघावर दोन वर्षांची बंदी येईपर्यंत होते, या बंदीनंतर हा संघ आयपीएलमध्ये परतला आहे; पण धोनीने 'थलैवा' स्टाईलमध्ये 'आपल्या' संघाचे स्वागत केले आहे.

रांची : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज म्हणजे महेंद्रसिंह धोनी असे समीकरण चेन्नई संघावर दोन वर्षांची बंदी येईपर्यंत होते, या बंदीनंतर हा संघ आयपीएलमध्ये परतला आहे; पण धोनीने 'थलैवा' स्टाईलमध्ये 'आपल्या' संघाचे स्वागत केले आहे.

चेन्नई संघाची पिवळ्या रंगाची जर्सी आणि त्यावर सात हा क्रमांक आणि त्यावरील 'थाला' असे उल्लेख असलेले आपले पाठमोरे छायाचित्र धोनीने इन्स्टाग्रामवर 'पोस्ट' केले आहे. तमीळ भाषेतील 'थाला' या शब्दाचा अर्थ प्रमुख, नेता किंवा 'बॉस' असा होतो. 
चेन्नई सुपर किंग्ज संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आल्यानंतर धोनी पुणे सुपरजायंट्‌स संघातून खेळला; पण तो तेथे रमला नाही.

गतवर्षी त्याच्याकडून कर्णधारपदही काढून घेण्यात आले; परंतु या संघाने गतवर्षी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. दोन वर्षांची बंदी संपल्यानंतर चेन्नईसह राजस्थान रॉयल्सचेही पुनरागमन झाले आहे. 

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने 2010 आणि 2011 मध्ये आयपीएलचे आणि चॅंपियन्स लीगचे 2010 आणि 2014 मध्ये अजिंक्‍यपद मिळवलेले होते. धोनी पुन्हा चेन्नई संघातून खेळणार का हे अजून निश्‍चित नाही. यंदाच्या मोसमात नव्याने सर्व खेळाडूंचा लिलाव होणार आहे; परंतु 'बीसीसीआय'ने काही खेळाडूंना राखण्याचा पर्याय दिला, तर धोनी चेन्नई संघाचा प्रमुख खेळाडू असेल, असे फ्रॅंचायजीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news cricket IPL Chennai Super Kings MS Dhoni