esakal | क्रिकेट : भारत-इंग्लंडमध्ये 2018 मध्ये पाच कसोटींची मालिका
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Joe Root

पुढील वर्षी 3 जुलैपासून भारताचा इंग्लंड दौरा सुरू होईल. जुलै ते सप्टेंबर 2018 असा या दौऱ्याचा कालावधी असेल. तीन महिन्यांच्या या दौऱ्याची सुरवात ट्‌वेंटी-20 मालिकेने होईल. त्यानंतर एकदिवसीय मालिका आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका असा हा कार्यक्रम आहे.

क्रिकेट : भारत-इंग्लंडमध्ये 2018 मध्ये पाच कसोटींची मालिका

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाच्या पुढील वर्षी होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने काल (मंगळवार) जाहीर केले. पुढील वर्षी 3 जुलैपासून सुरू भारत आणि इंग्लंडमधील मालिकेस सुरवात होईल. 

इंग्लंडच्या 2018 च्या मोसमातील वेळापत्रक क्रिकेट मंडळाने काल जाहीर केले. या मोसमात इंग्लंडचा संघ एकूण सात कसोटी, नऊ एकदिवसीय आणि चार ट्‌वेंटी-20 सामने खेळणार आहे. यात इंग्लंडच्या भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड या देशांविरुद्ध मालिका होणार आहेत. 

24 मे 2018 पासून लॉर्डसवर पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटींच्या मालिकेने इंग्लंडच्या मोसमास सुरवात होईल. त्यानंतर स्कॉटलंडविरुद्ध एकमेव एकदिवसीय सामना 10 जून रोजी होईल. यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एकदिवसीय आणि एक ट्‌वेंटी-20 सामना होईल. 

पुढील वर्षी 3 जुलैपासून भारताचा इंग्लंड दौरा सुरू होईल. जुलै ते सप्टेंबर 2018 असा या दौऱ्याचा कालावधी असेल. तीन महिन्यांच्या या दौऱ्याची सुरवात ट्‌वेंटी-20 मालिकेने होईल. त्यानंतर एकदिवसीय मालिका आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका असा हा कार्यक्रम आहे. कसोटीमध्ये भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ ताकदवान असल्याने ही मालिका चुरशीची होईल, अशी अपेक्षा आहे. 

भारताचा इंग्लंड दौरा

3 जुलै 2018 पहिली ट्‌वेंटी-20
6 जुलै दुसरी ट्‌वेंटी-20
8 जुलै तिसरी ट्‌वेंटी-20
12 जुलै पहिली वन-डे
14 जुलै दुसरी वन-डे
17 जुलै तिसरी वन-डे
1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट पहिली कसोटी
9 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दुसरी कसोटी
18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट तिसरी कसोटी
30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर चौथी कसोटी
7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर पाचवी कसोटी
loading image