esakal | पहिल्या कसोटीसाठी शिखर धवन तंदुरुस्त 
sakal

बोलून बातमी शोधा

File photo of Shikhar Dhawan

पहिल्या कसोटीसाठी शिखर धवन तंदुरुस्त 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी सलामीवीर शिखर धवन पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या तंदुरुस्तीच्या प्रगतीची संघाचे फिजिओ निरीक्षण करत आहेत आणि अंतिम अहवालानंतरच त्याच्या उपलब्धतेविषयी निर्णय घेतला जाईल, असे 'बीसीसीआय'ने स्पष्ट केले. 

दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यास येत्या शुक्रवारपासून सुरवात होत आहे. या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी धवनला दुखापत झाली होती. यातून तो सावरला असून पहिल्या कसोटीच्या संघनिवडीसाठी उपलब्ध असेल. गेल्या दोन दिवसांपासून जडेजाला ताप आला आहे. तो सध्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहे. केप टाऊनमधील स्थानिक वैद्यकीय सल्लागारांच्या सल्ल्यानुसार, भारतीय संघ व्यवस्थापनाने जडेजाला रुग्णालयात दाखल केले आहे. येत्या 48 तासांत तो पूर्ण तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. 

या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी, सहा एकदिवसीय सामने आणि तीन ट्‌वेंटी-20 सामने खेळणार आहे. 

कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ : 
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), रविचंद्रन आश्‍विन, जसप्रित बुमराह, शिखर धवन, रवींद्र जडेजा, भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी, हार्दिक पांड्या, पार्थिव पटेल, चेतेश्‍वर पुजारा, लोकेश राहुल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), ईशांत शर्मा, रोहित शर्मा, मुरली विजय, उमेश यादव. 

loading image
go to top