भारताची विजयी हॅटट्रिक; वर्षाची यशस्वी सांगता 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 December 2017

मुंबई : सलग तिसरा सामना जिंकून भारताने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 क्रिकेट मालिकेत त्यांना व्हाइटवॉश देण्याचे लक्ष्य साधले; पण आजच्या अखेरच्या सामन्यातील विजयासाठी प्राण कंठाशी आले होते. या यशासह भारताने 2017 ची यशस्वी सांगताही केली. 

वानखेडे स्टेडियमवरील हा सामना चौकार-षटकारांनी गाजेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र धावांसाठी फलंदाजांना संघर्ष करावा लागला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला 135 धावांत रोखल्यावर भारताला हे आव्हान पार करण्यासाठी अखेरच्या षटकापर्यंत मैदानात राहावे लागले. धोनी आणि कार्तिक यांनी अनुभव पणास लावत मोहीम फत्ते केली. 

हुकमी रोहित शर्मा 27 धावांवर बाद झाल्यावर भारताला टॉप गिअर टाकणे कठीण जात होते. श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे मैदानावर असेपर्यंत चिंता नव्हती; परंतु अय्यर धावचीत झाला आणि पांडेही माघारी फिरल्यावर थोडी चिंता वाढली. 28 चेंडूंत 23, 12 चेंडूंत 14 धावांची गरज असे चित्र होते. सात चेंडूंत 9 धावांची गरज असताना कार्तिकने नुवान प्रदीपला षटकार मारून विजय निश्‍चित केला. 

तत्पूर्वी, आज नाणेफेकीचा कौल रोहितच्या बाजूने लागला आणि त्याने अर्थातच प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दव पडणार असल्यामुळे रोहितने पहिल्या षटकापासून ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरला आक्रमणावर लावले; पण दुसऱ्या बाजूने त्याचा पुणे वॉरियर्सचा सहकारी उनाडकटने दोन विकेट मिळवल्या. दरम्यान, वॉशिंग्टनही यशस्वी ठरला. त्यामुळे श्रीलंकेची 4 षटकांतच 3 बाद 18 अशी अवस्था झाली आणि तेथेच त्यांच्या डावाला ब्रेक लागला. त्यांचा पुढचा प्रवास अडखळत्या वाटेवरचा होता. डावाच्या मध्यावर पंड्यानेही आपल्या खात्यात विकेटची जमा केली. 6 बाद 85 अशी अवस्था झाल्यानंतर त्यांना अपेक्षित धावसंख्याही उभारता येणार नाही, हे स्पष्ट झाले होते. 

बुमराऐवजी संधी देण्यात आलेल्या महंमद सिराजला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अखेरच्या षटकात शानाकाने 18 धावा फटकावल्या. त्यामुळे श्रीलंकेला 135 धावा करता आल्या. 

संक्षिप्त धावफलक 
श्रीलंका : 20 षटकांत 7 बाद 135
(संदिरा समराविक्रमा 21 -17 चेंडू, 3 चौकार, असेला गुणरत्ने 36 -37 चेंडू, 3 चौकार, तिसारा परेरा 11 -6 चेंडू, 2 चौकार, दुसान शनाका नाबाद 29 -24 चेंडू, 2 षटकार, जयदेव उनाडकट 2-15, सिराज 1-45, हार्दिक पंड्या 2-25)
पराभूत विरुद्ध भारत : 19.2 षटकांत 5 बाद 139 (रोहित शर्मा 27 -20 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, श्रेयस अय्यर 30 -32 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, मनीष पांडे 32 -29 चेंडू, 4 चौकार, महेंद्रसिंग धोनी नाबाद 16 -10 चेंडू, 2 चौकार, दिनेश कार्तिक नाबाद 18 -12 चेंडू, 1 षटकार, दुशमंथा चमिरा 2-22, शनाका 2-27)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news cricket news India versus Sri Lanka Rohit Sharma Manish Pandey