रोहित शर्मा ठरणार मुंबईकर नववा कर्णधार 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 December 2017

धरमशाला : भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा प्रथमच देशाचे नेतृत्व करणार आहे. पॉली उम्रीकर, अजित वाडेकर यांच्यापासून सचिन तेंडुलकरपर्यंत सरस कर्णधार देणाऱ्या मुंबईचा रोहित शर्मा नववा आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरणार आहे. 

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितला ही संधी मिळाली आहे. या अगोदर गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात विराट खांदा दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्‍य रहाणेने नेतृत्व केले होते. विशेष म्हणजे, तो सामनाही धरमशाला येथेच झाला होता. 

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सला तीन विजेतेपद मिळवून देताना रोहितच्या नेतृत्वाचे गुण समोर आले होते. विराट कोहली नेतृत्व करत असताना रोहित एकदिवसीय संघाचा उपकर्णधार होता. 

देशाचे नेतृत्व करणे म्हणजे आयपीएलमधील नेतृत्वापेक्षा फार मोठी जबाबदारी आहे; परंतु कर्णधारपदाचे मूलभूत तंत्र तेच असते, असे रोहितने सांगितले. आयपीएलपेक्षा हा संघ वेगळा आहे; परंतु या संघातील खेळाडूंबरोबर काही वर्षे खेळत असल्यामुळे प्रत्येकाची जमेची आणि कमकूवत बाजू माहीत आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला आत्मविश्‍वास देणे महत्त्वाचे आहे, असेही त्याने स्पष्ट केले. 

माझ्या नेतृत्वाच्या शैलीत फार बदल करण्याची गरज नाही. आयपीएल आणि देशाचे क्रिकेट यातील मानसिकतेत बदल असतो. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत माझ्याकडून चांगल्या धावा झाल्या होत्या, याचा फायदा मला या एकदिवसीय मालिकेत होईल, असे त्याने सांगितले. 

मुंबईकडून खेळलेले आत्तापर्यंतचे कर्णधार (कसोटी-एकदिवसीय) 
वीनू मंकड, पॉली उम्रीगर, गुलाबराय रामचंद, अजित वाडेकर, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, अजिंक्‍य रहाणे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news cricket news India versus Sri Lanka Rohit Sharma Virat Kohli